bmc 
मुंबई

Government Employee: आणखी एक गुड न्यूज! अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ; प्रशासकीय मंजुरीही मिळाली

BMC News : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. वेतनश्रेणी सुधारणेनंतर विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती. याअनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकांमधील चर्चा तसेच विविध कर्मचारी, कामगार संघटनांसोबत चर्चा करुन ही बाब देखील आता मार्गी लागली आहे.

संतोष कानडे

Mumbai Mahanagar Palika: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने यूपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे. केंद्राप्रमाणे राज्यातदेखील ही पेन्शन योजना लागू होणार आहे. मागच्या महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ झाली. आता मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी देण्यात आली असली तरी, सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती. ही बाब मार्गी लावून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. अशी माहिती मनपाने प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

प्रेस नोटमध्ये पुढे म्हटलंय की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. वेतनश्रेणी सुधारणेनंतर विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती. याअनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकांमधील चर्चा तसेच विविध कर्मचारी, कामगार संघटनांसोबत चर्चा करुन ही बाब देखील आता मार्गी लागली आहे.

महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात येणारा वाहन भत्ता, रजा प्रवास सहाय्य, तसेच पदांशी संलग्न असणारे विविध भत्ते, मुलांच्या शिक्षणाकरीता भत्ता, दिव्यांग महिला कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता यामध्ये वाढ करण्यास महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. भत्ते वाढसंदर्भातील इतर प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन सविस्तर परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने निर्गमित करण्यात येईल, असं प्रसिद्धी पत्रकामध्ये शेवटी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT