मुंबई: कोरोना महामारीच्या काळातील लॉकडाऊन दरम्यान वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात एकूण 2801 वाहनांची चोरी झाली असून त्यापैकी फक्त 1085 वाहनांचा शोध लावण्यात पोलिस विभागाला यश आले आहे. मात्र, यामध्ये चोरीचे वाहन शोधून काढण्यात तब्बल 39 टक्याने घट झाली आहे.
गेल्यावर्षी कोविड 19 च्या काळात मुंबईत लॉकडाऊन होते. दरम्यान एकूण गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, कोरोना काळातील सुरक्षा व्यवस्थेची सर्वात मोठी जबाबदारी पोलिस विभागावर असल्याने वाहन चोरीच्या घटनांच्या तुलनेत या काळात चोरीच्या वाहनांची शोधमोहीम थंडावली होती. यामध्ये एकूण 2801 वाहन चोरी गेले असून, त्यापैकी फक्त 1085 वाहनांचा शोध लागू शकला आहे. या एकूण चोरीच्या वाहनांमध्ये 2019 दुचाकी वाहने आहे. त्याचप्रमाणे 185 चारचाकी वाहने आहे. तर 623 रिक्षासह इतर वाहनांची नोंद पोलीस विभागात करण्यात आली आहे.
लॉकडाऊन दरम्यान मुंबईच्या एन्ट्री-एक्झिट पॉईंट आणि कडेकोट नाकाबंदी असतानाही चोरट्यांनी मुंबईहून गाड्या पळवून नेण्यात यश आले आहे. यापूर्वी 2019 मध्ये 2619 वाहने चोरी करण्यात आल्या तर 1157 वाहनांचा तपास लावण्यात आला होते. सुमारे 43 टक्के वाहनांचा शोध घेण्यास पोलिस यशस्वी झाले होते. यामध्ये गोरेगाव, दहिसर, वांद्रे ते जोगेश्वरी, घाटकोपर ते मुलुंड, चेंबूर ते मानखुर्द, या भागातील सर्वाधिक वाहनांची चोरी करण्यात आली असून, चोरट्यांना मुंबईबाहेर पडण्यात सोपे झाले झाले असल्याचे दिसते आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
चोरीची वाहने गुजरात राजस्थानात
2018 मध्ये मुंबई पोलिसांनी विशेष मोटर वाहन चोरी युनिट आणि अँटी-चेन स्नॅचिंग युनिट्स मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलमध्ये विलीन केले होते. प्रॉपर्टी सेलचे अधिकारी शहरात कार्यरत आंतरराज्यीय टोळ्यांवर लक्ष केंद्रित करतात. बहुतेक चोरीची वाहने मुंबई आणि धुळे मार्गावरून गुजरात आणि राजस्थान येथे नेली जातात. शहरातील जागेअभावी आणि नागरी नियोजनामुळे लाखो वाहने फुटपाथवर किंवा पदपथावर उभ्या राहिल्याने बहुतांश वाहने अनारक्षित पार्किंगमधून चोरी केली जातात.
पांढऱ्या चारचाकी वाहनांची सर्वाधिक चोरी
चारचाकी वाहनांमध्ये पांढऱ्या गाड्यांना मोठी मागणी आहे. राजस्थानात दारू पिण्यास बंदी घातलेल्या गुजरात आणि मद्यपान करणार्यांनी गुजरातमध्ये अवैध मद्य विक्री करणाऱ्यांनी चारचाकी वाहने खरेदी केली आहेत. तस्कर या चोरी झालेल्या मोटारींचा वापर करतात आणि जर पोलिस त्यांच्या मागोमाग येत असतील तर अशा वाहनांना रस्त्यावर सुद्धा सोडून देतात. दरम्यान वाहनांचा चेसिस नंबर खराब झाल्यामुळे आणि नंबर प्लेट बदलल्यामुळे आणि कार किंवा गुजरात किंवा राजस्थान सीमेजवळील पोलिस ठाण्यांमध्ये गाडी विना ट्रॅक ठेवण्यात आल्यामुळे पोलिस कारच्या मालकाचा शोध घेण्यास असमर्थ ठरतात.
-------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Increase vehicle theft during lockdown Mumbai Search stolen vehicles dropped
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.