Independence Day 2022 Unique patriotism of Kalyan youth by covering distance of 75 km bicycle mumbai sakal
मुंबई

75 किमी अंतर सायकलने पार करत कल्याणकर तरुणाची अनोखी देशभक्ती

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कल्याण मधील सायकलस्वार भूषण पवार यांनी कल्याण - पडघा - शहापूर - आटगाव असा मुंबई नाशिक महामार्गाने प्रवास करत अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सादरा केला

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कल्याण मधील सायकलस्वार भूषण पवार यांनी कल्याण - पडघा - शहापूर - आटगाव असा मुंबई नाशिक महामार्गाने प्रवास करत अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सादरा केला. कल्याण ते इगतपूरी असे 75 किमी चे अंतर सायकलने त्यांनी पार केले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिवाजी चौकातील मुख्यालयातून आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी या सायकल स्वाराला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर या युवा सायकल स्वाराची इगतपुरीच्या दिशेने सायकल वरुन धाव सुरू झाली. चार तासांत भूषण यांनी हे अंतर पार करत आपला टप्पा पूर्ण केला.

कल्याण येथे राहणारे भूषण पवार यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सायकल चालवित अनोख्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेता. 75 किमी सायकल रायडींग करण्याचे त्यांनी ठरविले त्यानुसार दुपारी त्यांनी कल्याण मुख्यालय येथून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. दांगडे यांसह सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता व सायकलपटू प्रशांत भागवत उपस्थित होते. कल्याण-पडघा-शहापूर-आटगाव असा प्रवास त्यांनी मुंबई नाशिक महामार्गावरुन सुरुवात केला. प्रवासात लागणारी अत्यावश्यक लागणारी सामग्री, सायकलमध्ये बिघाड झाला तर दुरुस्तीचे साधने पाठीशी बांधली होती. सायकलच्या अग्रभागी तिरंगा ध्वज बांधण्यात आला होता.

चार पडघा ते शहापूर प्रवास दरम्यान आलेले रस्त्यावरील चढ, उतार पार करत अवघड वळणवाटेचा इगतपुरीचा महत्वपूर्ण टप्पा भूषण यांनी चार तासांत पार केला. या रस्त्यावरुन येजा करणारे इतर वाहनांमधील प्रवासी हात उंचावून भूषण यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देत होते. मध्येच पाऊस, वारा, खड्डे यांना तोंड देत भूषणने इगतपुरीचा घाटमाथा यशस्वी पार केला. काही वेळ थांबवून त्याने पुन्हा परतीचा प्रवास सुरू करुन दुपारपर्यंत कल्याण गाठले. कल्याण मधील सायकल प्रेमींनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

जेवढी ताकद लावायची आहे लावा साहेब... मराठी मुद्द्यावरून मनसेच्या विरोधात उतरला हिंदुस्तानी भाऊ? म्हणाला, 'ते लोक पैसे... '

SCROLL FOR NEXT