Chennai Mumbai Flight Bomb Threat Esakal
मुंबई

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

Indigo Flight Bomb: सध्या विमानाचा शोध सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात परत आणले जाईल.

आशुतोष मसगौंडे

चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी मिळाली. फ्लाइट 6E 5314 चेन्नईहून सकाळी 7 वाजता उड्डाण केले.

सकाळी साडेनऊच्या सुमारास ते मुंबई विमानतळावर उतरले. विमानतळ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली. सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप उतरवण्यात आले. सध्या संपूर्ण विमानाचा शोध सुरू आहे.

इंडिगोने निवेदन जारी करून म्हटले आहे की, चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 5314 ला बॉम्बची धमकी मिळाली आहे.

मुंबईत उतरल्यावर क्रूने प्रोटोकॉलचे पालन केले. सुरक्षा एजन्सीच्या सूचनेनुसार विमान निर्जन ठिकाणी नेण्यात आले. सर्व प्रवासी विमानातून सुखरूप उतरले आहेत. सध्या विमानाचा शोध सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात परत आणले जाईल.

अलीकडच्या विमानाला बॉम्ब धमकी मिळण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी दिल्लीहून बनारसला जाणाऱ्या विमानालाही अशीच धमकी मिळाली होती.

दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. आता शनिवारी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये अशीच एक चिठ्ठी सापडली. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुढील ३ दिवस महत्त्वाचे! राज्यात पावसाचा जोर वाढणार, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा अंदाज; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Inspirational Story: अनवाणी पायाने धावली आई! बीडमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जिंकली मॅरेथॉन...

Jotiba Dongar News : ऊन सावली अन् विक्रमी गर्दीत रंगली जोतिबाची नगर प्रदक्षिणा...

Marathi News Live Updates : BPSC TRE 4 मधील ३२,३८८ रिक्त पदांसाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे ढकलली

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

SCROLL FOR NEXT