Sahil Khan And Manoj Patil Team eSakal
मुंबई

'या' प्रकरणात साहिल खानला मुंबई हायकोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

सुनिता महामुनकर

मुंबई : आंतरराष्ट्रीय बॉडिबिल्डर मनोज पाटील (Body builder Manoj Patil) यांना आत्महत्येस प्रवृत्त (suicide in force) केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात अभिनेता साहिल खानला (Sahil Khan) आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High court) सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर (Granted pre arrest bail) केला. पाटील यांना साहिलने आत्महत्येसाठी प्रवृत्त केले, असे प्रथमदर्शनी आढळत नाही, असे निरिक्षण न्या नितीन सांब्रे यांनी व्यक्त केले आहे. साहीलला पंचवीस हजार रुपयांचा जामीन मंजूर केला असून तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगमुळे पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र वेळीच उपचार मिळाल्यामुळे पाटील यांचा जीव बचावला होता. साहिल आणि पाटील यांच्यामधील ब्रॅण्ड वॉरमुळे सोशल मीडियावर यावर चर्चा झाली होती. मनोज पाटील यांच्याबाबत ट्विट करण्याबाबत न्यायालयाने मनाई केली आहे.

त्यातून साहिलच्या समर्थकांनी पाटील यांना ट्रोल केले. त्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीतून ही घटना घडली, असे ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे. पाटील यांच्या निकटवर्तीयांनी याबाबत आरोप केले आहेत. मात्र साहिलने या आरोपांचे खंडन केले आहे. साहिलने स्टाईल या सिनेमात काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Crime : किरकोळ वादातून डोकं दगडानं ठेचलं, बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात १७ वर्षीय तरुणाची हत्या; २ अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

UGC NET 2025 अ‍ॅडमिट कार्ड जाहीर; 31 डिसेंबरच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट 'असे' करा डाऊनलोड!

SA20: बापरे... क्रिकेट चाहत्याने पकडला तब्बल १.०८ कोटींचा कॅच! T20 सामन्यातील Video होतोय व्हायरल

सोलापूरमध्ये मोठा ट्विस्ट! काँग्रेसने तिकीट दिल्यानंतर महिला उमेदवारांचा MIM मध्ये प्रवेश, काय दिलं कारण?

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेला अटक, दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT