bmc sakal
मुंबई

UAEतून मुंबईत येणाऱ्यांना सात दिवस होम क्वारंटाईनची सक्ती नाही: BMC

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेने United Arab Emirates आणि दुबईतून येणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच कोरोनाची जोखिम अधिक असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी काही निर्बंध लागू केले होते. अशा प्रवाशांना आल्यानंतर RT-PCR टेस्ट आणि सात दिवसांचे होम क्वारंटाईन सक्तीचे होते. मात्र आता BMC ने त्यामध्ये बदल केला आहे.

मुंबईमध्ये दुबईसह UAE मधून येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता अनिवार्यपणे 7 दिवसांच्या होम क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली आहे, अशी माहिती BMC ने दिली आहे. मात्र आल्यानंतर प्रवाशांना RT-PCR करणं बंधनकारक असणारच आहे. अधिकाऱ्यांनी 29 डिसेंबर रोजी दुबईसह संयुक्त अरब अमिराती (USE) मधून मुंबईत येणाऱ्यांना 7 दिवसांच्या होम क्वारंटाईन आणि ऑन-अरायव्हल RT-PCR चाचणी घेणे बंधनकारक केले होते.

मात्र आता BMC ने स्पष्ट केलंय की, "यापुढे दुबईसह संयुक्त अरब अमिराती (USE) मधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोणतेही विशेष SOP लागू होणार नाहीत. 'जोखीम असलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लागू होणारी मार्गदर्शक तत्त्वे संयुक्त अरब अमिरातीमधून येणाऱ्या प्रवाशांना लागू केली जातील. हे आदेश 17 जानेवारी 2022 च्या मध्यरात्रीपासून लागू केले जातील, असंही कळवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

Karnataka Government Employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 1.50 टक्क्यांची वाढ; 'या' तारखेपासून लागू होणार नवे वेतन

Latest Marathi News Live Update : नीट प्रकरणातील संशयित शुभम खैरनारची सीबीआयकडून चौकशी सुरू, दिल्लीला नेण्याची शक्यता

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SCROLL FOR NEXT