ED Arrested Naresh Goyal Sakal
मुंबई

Jet Airways Scam : नरेश गोयल जेट एअरवेज घोटाळ्याचे मास्टरमाईंड; ईडीने केला दावा

जेट एअरवेज घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नरेश गोयल यांनी ईडीच्या कारवाईविरोधात दाखल याविकेवर ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर दाखल केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - जेट एअरवेज घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नरेश गोयल यांनी ईडीच्या कारवाईविरोधात दाखल याविकेवर ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर दाखल केले आहे. पीएमएलए कायद्याच्या तरतुदींचे पालन न करता गोयल यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचे तसेच अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप गोयल यांनी दाखल याचिकेत केला आहे.

त्यावर ईडीने प्रतिज्ञापत्राद्वारे याचिकाकर्ता तपासात असहयोगी, उदासीन आणि चौकशीदरम्यान प्रश्नांची टाळाटाळ करणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीने चौकशीत दिलेली माहिती संशयास्पद होती. म्हणूनच, तपास पुढे जाण्यासाठी आणि गुन्ह्याच्या प्रक्रियेचा माग काढण्यासाठी नरेश गोयलला अटक करण्यात आल्याचे ईडीच्या प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे.

गोयल मास्टरमाईंड

जेट एअरवेज घोटाळा प्रकरणात आरोपी नरेश गोयल यांना 'मास्टरमाईंड' म्हणजेच 'मुख्य आरोपी' असल्याचा दावा, ईडीने प्रतिज्ञापत्रात केला आहे. नरेश गोयल यांना अनेक वेळा समन्स बजावले होते. परंतु त्यांनी चौकशीसाठी हजेरी लावली नाही. परिणामी तपासाची गती कमी झाली. तपासाच्या उद्देशाने आणि गुन्ह्याचा खुलासा करण्यासाठी कोठडी आवश्यक असून पीएमएलए अंतर्गत अनिवार्य सर्व प्रक्रियांचे पालन केल्यानंतर अटक करण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे.

शेल कंपन्यांचा वापर

शेल कंपन्यांच्या माध्यमातून घोटाळ्यातून मिळवलेले पैशाचे हस्तांतरण विविध खात्यात करण्यात आल्याचा ईडीने आरोप केला हटले आहे. जेट एअरवेज कंपनीच्या खात्यातील पैसे गोयल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वैयक्तिक खर्चासाठी वापरले असून गोयल यांनी विविध बँकांकडून अनेक कर्जे घेऊन अनेक वर्षांपासून कर्ज थकित ठेवल्याचा दावा ईडीने केला आहे.

अशाप्रकारे गोयल आणि त्याच्या साथीदारांनी, विविध संस्थांद्वारे, घोटाळ्यातून कमवलेल्या 538 कोटी रुपयांची उलाढाल केल्याचा ईडीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT