Jitendra Awhad, vaishali darekar and rajan vichare
Jitendra Awhad, vaishali darekar and rajan vichare sakal
मुंबई

Kalyan Loksabha Election : आव्हाडांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची खलबत्ते

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - एकीकडे भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदार संघावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. अशातच श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची उमेदवार व नेत्यांची आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाणे आणि कल्याण लोकसभेबाबत चर्चा केली.

त्यानंतर श्रीकांत शिंदेची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यामुळे ते कोणत्या चिन्हावर लढणार असा सवाल यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला. तसेच पुढील प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बहुचर्चित अशा कल्याण लोकसभेसाठी महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर शनिवारी दुपारी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह महत्वाच्या पदाधिकाºयांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे, कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर, युवसेना सचिव वरून सरदेसाई, केदार दिघे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी करण्यात आलेल्या चर्चेत ठाणे आणि कल्याण लोकसभेची रणनिती ठरविण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच कल्याणचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठाण्याचा उमेदवार कोण असेल त्याला कसे सामोरे जायचे, महायुतीमधून इच्छुक असलेल्यांपैकी कोणीही आला तरी त्यासाठी कशी रणनिती आखली जाऊ शकते यावर देखील चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता, श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी कोणी जाहीर करावी हा त्यांचा प्रश्न आहे, मला असे वाटते की मुख्यमंत्र्यांनीच टाळले असेल की, माझ्या मुलाची उमेदवारी मी का जाहीर करावी म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असेल.

भाजपमध्ये अस्वस्थता आहे हे कोणीही नाकारू शकत नाही, त्याचे परिणाम आजच्या घडीला सांगू शकत नाही, ४४ दिवस अजून बाकी आहेत, ४४ दिवसानंतरच भविष्य सांगणे हे कोणत्या भविष्यकारालाही जमणार नसल्याचे देखील आव्ह्दा यांनी यावेळी सांगितले.

मिंदे गटाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी शेवटी कोण गेले तर देवेंद्र फडणवीस यातूनच समजून जा की त्यांच्यात काय सुरू आहे ते, मी आधीच सांगितल आहे की, तुम्हाला उमेदवार मिळत नसेल तर तुम्ही मला बिनविरोध निवडून द्या. पुढची प्रचाराची रणनीती आणि दिशा ठरवण्यासाठी आव्हाड यांची भेट घेतली.

- राजन विचारे, उमेदवार, उध्दव सेना.

उपमुख्यमंत्र्यांनी श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर करणे हे दुर्देवी आहे. हिंगोली ची जागा एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार बदलायला लावला, कल्याणची जागा जाहीर झाली नाही आणि फडणवीस यांनी परस्पर उमेदवार जाहीर केला. यामुळे ते स्वत:ला दुसरी शिवसेना जी काही म्हणतात याचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत की देवेंद्र फडणवीस आहेत हेच समजत नाही. त्यांचे उमेदवार अद्याप ठरत नाही याला कारण भाजप आहे.

- वरुण सरदेसाई, युवा सेना सचिव, उध्दव सेना.

श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र ते कोणत्या चिन्हावर लढणार आहेत हे कोणाला माहित आहे का? कारण त्यांची उमेदवारी ही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे, ते नक्की कमळावर लढणार की धनुष्यबाणावर असा प्रश्न आहे. कल्याण लोकसभे मधून आदित्य ठाकरे आणि वरून सरदेसाई निवडणूक लढवतील असे कधीच कोणी म्हंटले नव्हते.

- वैशाली दरेकर, उमेदवार कल्याण, उध्दव सेना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT