मुंबई

..इथे मोदींपासून राऊतांपर्यंत सगळेच 'निरो' आहेत..: आव्हाड

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- भारतामध्ये मोदींपासून राऊतांपर्यंत सगळेच निरोच्या आवेशामध्ये बोलत आहेत. रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत होता. अगदी तसेच भारतात बेस्ट कर्मचाऱ्यांना भाकरीची भ्रांत पडलेली असताना टिंगल टवाळी करण्याचे काम शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संजय राऊत यांनी बेस्ट कामगारांची टिंगल टवाळी करत ठाकरे सिनेमाचे म्युझिक बेस्ट आहे असे म्हटले आहे, यावर जितेंद्र आव्हाड यांनी अशी प्रतिक्रीया ई-सकाळशी बोलताना व्यक्त केली.

आव्हाड म्हणाले की, जेव्हा जेव्हा इथल्या कामगारांना आणि विद्यार्थ्यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे तेंव्हा हे सरकार उलथवून टाकलेले आहे. रोममध्ये तर एकच निरो होता पंरतु, भारतात सामान्यांना त्रास देणारे मोदी आणि राऊंतासारखे असंख्य निरो आहेत. रोम जळत असताना कामगारांच्या भुकेची चेष्टा करणारा निरो आणि संजय राऊत यांच्यात काहीच फरक नसल्याचेदेखील आव्हाड यांनी म्हटले आहे.

बेस्ट संपाची संजय राऊतांकडून खिल्ली; गाणी 'बेस्ट' आहेत (व्हिडिओ)

दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांकडून गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या संपाची शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडविली आहे. 'ठाकरे' चित्रपटाच्या म्युझिक लाँचवेळी सामच्या प्रतिनिधीने बेस्टच्या संपाबाबत विचारले असता या चित्रपटाचे संगीत बेस्ट झाल्याचे म्हटले होते. आज (शनिवार) 'ठाकरे' चित्रपटाच्या म्युझिक लाँचवेळी सामच्या प्रतिनिधीने संजय राऊत यांना बेस्ट संपाबाबत विचारल्यानंतर ते म्हणाले की सिनेमा बेस्ट झाला आहे आणि चित्रपटाचे संगीतही बेस्ट आहे, असे म्हटल्यानंतर उपस्थितांमध्ये त्यावेळी हशा पिकला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT