jelly fish sakal media
मुंबई

जेली फिशचा दंश वेदनादायक, समुद्र किनारी काळजी घ्या

मिलिंद तांबे

मुंबई : जुहू किनाऱ्यावर (juhu beach) गेल्या दोन दिवसांपासून जेली बॉटल फिशचा (jelly fish) वावर दिसत आहेत. जेली फिशचा दंश ( jelly fish bite) वेदनादायक असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन 'मँग्रो फाउंडेशन'ने (mangrove foundation) केले आहे. समुद्र किनाऱ्यांवर फलक लावून (notice on beach) काळजी घेण्याची आवाहन करण्यात आले आहे. (juhu beach-jelly fish-jelly fish bite-mangrove foundation-notice on beach-nss91)

रविवारी जुहूच्या किनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेलीफिशचा वावर पाहायला मिळत आहेत. मंगळवारी त्याची संख्या तुलनेने कमी झाली असली तरी काही जेली फिश आज ही किनाऱ्यावर येत आहेत. ताळेबंदीमुळे किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी असली तरी येणाऱ्या नागरिकांसाठी जेली फिश चा वावर धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे फलक लावून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पावसाळ्यात ब्ल्यू बॉटल जेलीफिश किनाऱ्यावर येत असतात.रविवारी देखील मुंबईत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटल्याने त्यासोबत मोठ्या संख्येने जेलिफिश समुद्र किनाऱ्यावर आल्या असाव्यात असा अंदाज समुद्री जीव अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी सांगितले. मँग्रो फाउंडेशनला याची माहिती मिळताच त्यांनी लागलीच समुद्र किनाऱ्यावर धाव घेऊन पाहणी केली. जुहू च्या समुद्र किनाऱ्यावर जेलिफिश बाबत माहिती फलक लावण्यात आले. त्यात जेलिफिश च्या माहिती सह जेलिफिश चा दंश झाल्यास कुणाशी संपर्क करावा किंवा कोणते उपचार घ्यावे याबाबतची महत्वाची माहिती देण्यात आल्याचे मँग्रो फाउंडेशनने सांगितले.

काय खबरदारी घ्यावी?

1) समुद्र किनाऱ्यावर लावलेल्या सुचनांच्या फलकांकडे दुर्लक्ष करू नये.

2) जर समुद्र किनारी किंवा पाण्यात जाण्यास मनाई केली असेल तर त्या नियमांचं पालन करावं

3) समुद्र किनाऱ्यावर जाणं टाळण हा उत्तम पर्याय आहे.

4)सुचनांकडे दुर्लक्ष करत समुद्र किनारी गेलातच तर विना चप्पलचे वावरू नये.

5)अनेक महारथी फोटो काढण्यासाठी जेलीफिश हातात घेतात. असं करणं अधिक धोकादायक ठरू शकतं.

दंश झाल्यास काय कराव?

जेलीफिशच्या दंशानं त्या भागात जळजळ होते आणि लाल पुरळांसह सूज येते.

दंश केलेल्या भागावर समुद्राचे पाणी लावणं.त्या भागास खाजवू आणि चोळू नये.

दंश केलेला भाग किंवा जखम कोमट पाण्यानं धुऊ शकता किंवा बर्फानं शेक देऊ शकता.

अधिक त्रास झाल्यास रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.

ब्ल्यू बॉटल जेलिफिश कसे ओळखाल?

ब्ल्यू बॉटल जेलीफिश या जलचरांना पारदर्शक फुग्यासारखा भाग असतो. त्याखाली निळ्या रंगाचे धाग्यासारखे झुंडक असतात. या झुंडकांना स्पर्श झाल्यास ते दंश करतात. हा दंश अत्यंत वेदनादायी असतो असे प्रदीप पाताडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी! ११ ऑगस्टला पाणी साठवून ठेवा; 'या' भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

IND vs SLC XI Warm UP Match: गौतम गंभीरने ज्याला दुर्लक्षित केले, त्याने आज मैदान गाजवले! श्रीलंकेच्या आठ विकेट्स, भारताचे पुनरागमन

प्रशांत किशोरांची पवार कुटुंबासोबत बैठक; सुनील तटकरे अनभिज्ञ; म्हणाले, ''ते आमच्यासाठी काम करतायेत माहीत नाही''

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: फ्री वायफाय वापरणं महागात पडलं! वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचा फोन हॅक, भामट्यांकडून २८ मिनिटांत ४ लाखांचा व्यवहार

SCROLL FOR NEXT