मुंबई

ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित यांचे निधन 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित ऊर्फ शांताराम (वय 95) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी वांद्रे येथील घरी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. पुरोहित यांच्या पार्थिवावर रात्री 10 वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पुरोहित हे मूळचे नागपूरचे होते. नागपूर विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अमरावती, नागपूर, मुंबईमधील विविध महाविद्यालयांमध्ये 40 वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. जोगेश्‍वरीतील इस्माईल युसूफ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. पुरोहित यांनी "शांताराम' या टोपणनावाने लेखन केले. 1989 मध्ये अमरावती येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्यांचे "अंधारवाट', "आठवणींचा पार', "उद्विग्न सरोवर', "काय गाववाले', "चंद्र माझा सखा', "चेटूक', "छळ आणि इतर गोष्टी', "जमिनीवरची माणसं', "ठेवणीतल्या चिजा', "धर्म', "मनमोर', "रेलॉं रेलॉं', "लाटा', "शांताराम कथा', "शिरवा', "संध्याराग', "सावळाच रंग तुझा' आदी साहित्य प्रसिद्ध आहेत. 2013 मध्ये त्यांना राज्य सरकारच्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT