मुंबई

उरणमध्ये कबड्डीचा जोश 

सकाळ वृत्तसेवा

उरण (बातमीदार) : कबड्डी कबड्डी असा आवाज... चढाई-पकडीचा थरार... कुठे टाळ्यांचा दणदणाट असा बोकडविरा येथे शेकडो प्रेक्षकांनी अनुभवला. निमित्त होते जिल्हा निवड कबड्डी स्पर्धेचे. उशिरापर्यंत क्रीडा संकुथरार आज लाबाहेरचे पटांगण कबड्डीप्रेमींच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी भरून गेले. 

जिल्हा निवड कबड्डी स्पर्धेला बोकडविरा येथे उत्साहात झाली. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी बोकडविरा ग्रामसुधार मंडळाचे माजी अध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते. 
स्पर्धा नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाली. परंतु त्यानंतरही कबड्डीप्रेमींनी मैदानावर मोठ्या संख्येने हजेरी लावली. 
खेळाडूंच्या कागदपत्रांची छाननी पहिल्या टप्प्यात करण्यात आली. प्रत्येक खेळाडूचे वजन मोजण्यात आले. त्यानंतरच योग्य ठरलेल्या खेळाडूंना खेळण्यास परवानगी देण्यात आली. 

सुसज्ज 6 मैदाने 
निवड चाचणी स्पर्धेसाठी बोकडविरा येथे उत्तम अशी 6 मैदाने तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून आलेले खेळाडू या व्यवस्थेवर खुश आहेत. पहिल्या दिवशी 64 पुरुषांचे संघ खेळले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT