मुंबई

मुंबईत नामकरणाचा नवा वाद, इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचे नाव का?; काँग्रेसचा थेट सवाल

सुमित सावंत

मुंबईः फोर्टमधील काळाघोडा परिसरातल्या चौकाला इस्रायलच्या माजी पंतप्रधानांचं नाव दिलं आहे. त्यावरून सध्या आता वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार आणि पालिका गटनेते रईस शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात रईस शेख यांनी इस्रायलच्या माजी पंतप्रधानांच्या नावाचा फलक हटवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. 

मी आपणांस सांगू इच्छितो की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात लोकप्रतिनिधीचा अवमान करत चुकीच्या पद्धतीने चौकाचे नामकरण करण्याचा नवीन पायदंड बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरु केला आहे आणि हे अत्यंत खेदजनक आहे', असं रईस शेख यांनी पत्रात म्हटलं आहे. 

मूळ भारतीय नावांसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेनं या नावाला मंजूरी दिलीच कशी?, असा सवाल विचारत काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. 

कालाघोडा परिसरातील एका चौकाला इस्त्रायलचे माजी पंतप्रधान सिमॉन पेरिस यांचं नाव देण्यात आलं आहे. 2018 मध्ये हा प्रस्ताव देण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त प्रविण परदेशी यांनी हा प्रस्ताव आणला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी सभागृहात हा प्रस्ताव मंजूर होऊन या चौकात इस्त्रायलच्या माजी पंतप्रधानांच्या नावाची पाटीही लागली. मात्र, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी कोणतंही योगदान नसलेल्या व्यक्तीचं नाव मुंबईतल्या रस्त्याला का असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.  तसंच, मुंबई महापालिकेच्या नियमावलीनुसार विदेशा व्यक्कीचं नाव रस्ते, चौक यांना दिलं जाऊ शकत नाही असंही विरोधकांचं म्हणणं आहे.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Kala Ghoda junction naming Controversy Raees Sheikh wrote letter uddhav thackeray

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT