Birthday Celebration Sakal
मुंबई

Tomato Birthday : महाग झालेले टोमॅटो देत साजरा केला बड्डे! भावाची बहिणीच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट

भावाची बहिणीच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट; टोमॅटो भेट दिल्याने शहरात बनला चर्चेचा विषय

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : गेल्या तीन-चार दिवसांत टोमॅटोच्या भावात प्रचंड वाढ झाल्याने टोमॅटो बाजारातून गायब झाले आहेत. तर दुसरीकडे टोमॅटो मिळत नसल्याने कल्याण मधील कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या एका भावाने वाढदिवसाच्या पार्टीत आपल्या बहिणीला दोन किलो टोमॅटो भेट दिले. तर तिच्या मामा आणि मावशीने एक एक असे दोन किलो टोमॅटो भेट देत तिचा वाढदिवस साजरा केल्याने कल्याण डोंबिवली परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचा भाव 140 रुपयांच्या आसपास पोहोचला आहे, काही दिवसांपूर्वी जो टोमॅटो 20 रुपये किलोने मिळत होता तो आता 140 रुपयांचा कसा झाला? महाराष्ट्रातील नाशिक, जुन्नर, पुणे येथून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना, काही दिवसांतच अवकाळी पाऊस व राजस्थान बीपर जॉय या चक्रीवादळामुळे पिकाचे नुकसान झाल्याने यंदा टोमॅटोचे भाव गगनाला भिडला.

मागणी वाढल्याने टोमॅटो मार्केट मध्ये गायब झाले आहेत. त्यातच टोमॅटो मार्केटमध्ये भेटत नसल्याने घरात स्वयंपाक करत असलेल्या गृहिणीमध्ये नाराजगी दिसत आहे. याचाच प्रकारे कल्याण कोचडी परिसरात राहणाऱ्या सोनल बोरसे या महिलेचा काल वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त तिने आपल्या सगळे नातेवाईक यांना पार्टीसाठी आपल्या घरात आमंत्रण दिले होते.

या पार्टीत सोनम यांच्या भावाने व त्यांच्या नातेवाईकांनी तिला वाढदिवसानिमित्त चक्क टोमॅटो गिफ्ट दिले. अचानक मार्केट मधून गायब झालेले टमाटो सुनील घरी पाहून ती आनंदीत झाली. व वाढदिवसानिमित्त सगळ्यात अनोखे व सगळ्यात महाग गिफ्ट असल्याचे तिने सांगत आनंद व्यक्त केला. तर दुसरीकडे भावाने व नातेवाईकिन टोमॅटो गिफ्ट दिल्याची बातमी पूर्ण शहरात पसरल्याने तिचा वाढदिवस हा चर्चेचा विषय बनलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Vaishanavi Girse : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी', सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT