मुंबई

Kalyan Crime: मालकीणीच्या दागिन्यांवर गांगुबाईचा डल्ला; गुन्हे अन्वेषण विभागाने केली अटक

शर्मिला वाळुंज

घरकाम करण्यास आलेल्या गांगुबाईने मालकीनीच्या घरातील दागिन्यांवरच आपला हात साफ केल्याची घटना घडली होती. 10 तोळे सोन्याचे दागिने चोरुन पळ काढलेल्या मोलकरणीला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. तिच्याकडून 2 लाख 97 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गंगूबाई उर्फ गिता लक्ष्मण दळवी (वय 50) असे अटक करण्यात आलेल्या मोलकरणीचे नाव आहे. 

डोंबिवली पश्चिमेतील खेती रोड परिसरात आशापुरा कृपा सोसायटीत राहणाऱ्या आस्था रणधीर पाटील (वय 19) यांच्या घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू होता. याच दरम्यान क्राईम ब्रँचचे हवालदार विश्वास माने आणि पोलीस शिपाई गुरूनाथ जरग यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले.

या फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यात मालकीण आस्था पाटील या राहत असलेल्या सोसायटीबाहेरच्या कंपाऊंडवरून एक महिला संशयीतरित्या ये-जा करताना आढळून आली. एकीकडे या महिलेला पोलीस निरीक्षक राहूल मस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण, पोलीस उप निरीक्षक संजय माळी, हवालदार विश्वास माने, बालाजी शिंदे, दत्ताराम भोसले, किशोर पाटील, विलास कडू, मेघा जाने, मिनाक्षी खेडेकर, मंगल गावित, गुरूनाथ जरग, नवसारे, शेकडे, लांडगे, अमोल बोरकर यांचे पथक जंग जंग पछाडत होते. तर दुसरीकडे संशयीत महिलेचे वर्णन तक्रारदार आस्था पाटील यांना दाखवून खात्री केली असता ही महिला आस्था यांच्या घरी काम करणारी मोलकरीण गंगूबाई उर्फ गिता दळवी हीच असल्याचे समोर आले. क्राईम ब्रँचने गंगूबाईला ती राहत असलेल्या मोठा गावातून ताब्यात घेतले. 

चौकशीदरम्यान सुरूवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र तांत्रिक विश्लेषणासह पोलिसी खाक्याद्वारे चौकशी केली असता तिने मालकीण आस्था पाटील यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. गुन्हे अन्वेषण विभागाने गंगूबाईकडून चोरलेले सर्वच्या सर्व 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: मोहन भागवत यांनी सातत्याने 'जनरेशन झेड'शी संवाद साधला आहे, याचा मला आनंद - राहुल नार्वेकर

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT