Crime sakal
मुंबई

Dombivali Crime : कल्याण डोंबिवलीत फटाके फोडणाऱ्या 150 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल

हवेची गुणवत्ता पातळी घसरल्याने दिवाळीत वायू प्रदूषणात वाढ होऊ नये यासाठी रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडण्यात यावेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - हवेची गुणवत्ता पातळी घसरल्याने दिवाळीत वायू प्रदूषणात वाढ होऊ नये यासाठी रात्री 8 ते 10 या वेळेत फटाके फोडण्यात यावेत असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र या आदेशाचे सर्रास उल्लंघन शहरात केले जात असून कल्याण डोंबिवली मध्ये 150 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डोंबिवली क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत 70 ते 80 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

वायू प्रदूषणावर नियंत्रण आणून शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी फटाके वाजविण्याची वेळेवर निर्बंध उच्च न्यायालयाने घालून दिले आहेत. सर्व महापालिका हद्दीत हे नियम जारी करण्यात आले आहेत. मात्र या नियमांची पायमल्ली कोठे ही होताना दिसत नाही. कल्याण डोंबिवली शहरातील अनेक भागात रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत नागरिक फटाके फोडत होते.

लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज या दिवसांत जास्त फटाके शहरात फोडले गेले. पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत 150 हून अधिक नागरिकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले गेले आहेत.

यातून नागरिक शहरात प्रदूषण होऊ नये म्हणून कोणती ही काळजी घेताना दिसत नाहीत. फटाक्यांची आतषबाजी करताना ध्वनी व वायू प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पण ती घेतली जात नाही. लहान मुलं, वृद्ध माणसं, आजारी व्यक्ती, अभ्यास करणारे विद्यार्थी यांना त्रास होऊ नये याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे.

पर्यावरण पूरक दिवाळी साजरी केली पाहिजे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कारवाई केली जात असून नागरिकांनी देखील थोडं सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

SCROLL FOR NEXT