कल्याण पूर्व मधील पालिकेच्या जे / 4 या प्रभाग क्षेत्रात येणाऱ्या विभागात कचरा उचलताना पालिका कर्मचारी
कल्याण पूर्व मधील पालिकेच्या जे / 4 या प्रभाग क्षेत्रात येणाऱ्या विभागात कचरा उचलताना पालिका कर्मचारी  
मुंबई

24 तासांनंतर कल्याण-डोंबिवली पूर्वपदावर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सलग सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागातील सखल भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. 24 तासांनंतर पूर परिस्थिती दूर होऊन जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र, बाधितांनी घरातील कचरा रस्त्यावर टाकण्यास सुरुवात झाली असून, साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

या वेळी सरकारी यंत्रणा, प्रसिद्धीमाध्यमे वेळेवर पोहचून बाधित नागरिकांना मदतीचा हात पोहचला; मात्र 26 जुलै 2005 रोजी झालेली घटना पुन्हा होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले आहे. 
शनिवारी रात्रीपासून बाधित झालेले नागरिक आपल्या घरी जाऊ लागले आणि रविवारी पूर्ण दिवस घरे स्वच्छ करत कचरा रस्त्यावर टाकू लागले.

कल्याण पूर्वमध्ये अनेक ठिकाणी कचरा उचलला असल्याचे प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी सांगितले; मात्र कल्याण पूर्वमधील पुना लिंक रोडवरील विठ्ठलवाडी नाल्याजवळ, तिसगाव नाल्याजवळ अनेक भागांत कचरा पडलेला असून तो कचरा वेळेवर न उचलल्यास साथीच्या आजाराचा फैलाव होण्याची शक्‍यता नाकारण्यात येत नाही.

आरोग्य शिबिर 
सखल भागात जसे जसे पाणी ओसरत आहे, तसे पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत सखल भागात आरोग्य शिबिर घेणे सुरू झाले असून आगामी सात दिवस उपाययोजना करण्यात आल्याची माहिती पालिका वैद्यकीय आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवांगरे यांनी दिली. 

नुकसानभरपाई द्यावी 
शहरी आणि ग्रामीण भागात अनेकांचे नुकसान झाले असून शासनाने त्याची भरपाई द्यावी, अशी मागणी होत असून यावर प्रांत अधिकारी नितीन महाजन यांनी सांगितले, की ग्रामीण भागात पंचनामा करून शासनाला अहवाल पाठविण्यात येणार आहे. पुढील आदेश आल्यावर अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT