Mumbai Sakal
मुंबई

कल्याण- डोंबिवलीतील रस्ते आणि त्यावरील खड्डे नागरिकांनी केले ट्रोल

खड्ड्यात जा नाही तर कल्याण डोंबिवली जा असे विशेषण ही देण्यात आले.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - रस्त्यांच्या दुरावस्थेवरून पालिका (Municipal) प्रशासना बरोबरच आता एमएमआरडीएवरही (MMRDA) टिका करण्यास नागरिकांनी सुरवात केली आहे. गणपतीच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे खडी टाकून बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर पालिका प्रशासनाने हाती घेतले. दहा दिवसांत पुन्हा त्या रस्त्यांवर खड्डे पडले असून आता केवळ व्हिडीओ नाही तर, स्थळ, रस्त्याचे नावही व्हायरल करण्यास सुरुवात नागरिकांनी सुरवात केली आहे. सुयोग (Suyog) हॉटेल (Hotel) समोरील रस्त्याचा असाच एक व्हिडिओ (Video) सकाळ पासून जोरदार व्हायरल होत आहे.

कल्याण डोंबिवलीतील रस्ते आणि त्यावरील खड्डे यावरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ट्रोल करण्यास आता सर्वसामान्य नागरिकांना सुरवात केली आहे. KDMC म्हणजे खड्डे, दगड, माती, चिखल अशी नवी व्याख्या करण्यात आली. त्यानंतर अभियंता दिनाच्या शुभेच्छा देताना कल्याण डोंबिवलीतील रस्ते बनविणारे अभियंता सोडून इतरांना शुभेच्छा देण्यात आल्या. खड्ड्यात जा नाही तर कल्याण डोंबिवली जा असे विशेषण ही देण्यात आले.

नागरिकांचा रोष आणि गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आधी रस्त्यावरील खड्डे भरण्यास पालिका प्रशासनाने सुरवात केली. खडी टाकून हे खड्डे भरण्यात येत असल्याने अनेक रस्त्यावरील खडी दहा दिवसांत वाहून जाऊन पुन्हा रस्ते जैसे थे झाले आहेत. याचीच माहिती देणारा एक व्हिडिओ एका जागरूक नागरिकाने बनविला आहे. पूर्वेतील सुयोग हॉटेल समोरील रस्त्यावर वाहन चालविताना बोटीत बसल्याचा अनुभव येत आहे असे त्यांनी या व्हिडीओ मध्ये म्हटले आहे. तसेच त्या खाली वर्ल्ड फेमस रस्ता असे नामकरण केले असून हा रस्ता पाहण्याची वेळ, स्थळ याची माहिती देत. ठेकेदाराचे नाव नेहमीचेच कामचुकार फेमस ठेकेदार व सत्ता, हद्द, आस्थापना सांगताना शिवसेना, केंद्र सरकार पुरस्कार विजेते कल्याण डोंबिवली महानगरपालिका, एमएमआरडीए अशी माहिती देत उपरोधिक टीका केली आहे. तसेच सर्वात शेवटी चित्रिकरण करणारा एक टॅक्स प्लेअर डोंबिवलीकर असे लिहीत प्रशासनाला टोला लगावला आहे.

खराब रस्ते, खड्डे यावरून पालिका प्रशासनाला जाब विचारून काही होत नाही हे लक्षात येताच आता सुज्ञ डोंबिवलीकरांनी व्हिडीओ, फोटो व्हायरल करत टीकेची झोड उठवण्यास सुरवात केली आहे हे दिसते.

वर्ल्डफेमसरस्ता

गणपती येण्याच्या 10 दिवसआधी हा रस्ता बनुन तयार होतो आणि गणपती जाईपर्यंत पुर्ववत होतो.

हा वर्ल्ड फेमस रोड पहाण्याचे ठिकाण : सुयोग हॉटेल समोरील रस्ता

वेळ : केव्हाही जा 24 तास खुला

ठेकेदाराचे नाव: नेहमीचेच फेमस कामचुकार

सत्ता / हद्द /अस्थापना : शिवसेना / केंद्र सरकार पुरस्कार विजेते कल्याण डोंबिवली महानगरपालिका/ MMRDA

चित्रीकरण : एक टॅक्स पेअर डोंबिवलीकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT