Kalyan To kasara railway stopped due to accident.jpg
Kalyan To kasara railway stopped due to accident.jpg 
मुंबई

रेल्वेगेटला डंपरची धडक; कल्याण ते कसारा रेल्वेसेवा ठप्प

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : नवीन वर्षाच्या तिसऱ्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास एका वाळूच्या डंपरने आंबिवली रेल्वेच्या गेटला जोरदार धडक दिल्याने कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान पाच ते सहा असा एक तास रेल्वे सेवा ठप्प होती. 6 वाजून 10 मिनिटाला सेवा पूर्वरत झाली मात्र सकाळी कसारा ते कल्याण आणि मुंबई कडे जाणाऱ्या रेल्वे प्रवासी वर्गाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. 

मध्य रेल्वेच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (ता. 3) पहाटे पाचच्या सुमारास शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान वाळूच्या डंपरने लेव्हल क्रॉसिंग करत असताना रेल्वे गेटला जोरदार धडक दिली. डंपरने धडक दिल्यावर लॉकिंग बेसमधून बाहेर आल्यानंतर एलसी बूमने ओएचई वायरला स्पर्श केला. ओएचई वायर तुटल्याने त्या परिसरात ब्लॉक घेत दुरुस्तीचे काम केले त्यामुळे कल्याण ते कसारा रेल्वे सेवा ठप्प झाली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच 6 वाजून 10 मिनिटाला काम पूर्ण होताच कल्याण ते कसारा रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्याने रेल्वे प्रवासी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला मात्र एक तास दहा मिनिटं लोकल सेवा बंद राहिल्याने प्रवासी वर्गाचे हाल झाले.

यात कल्याण कसारा उपनगरीय लोकल सेवा अणि अप मार्गावरील नंदीग्राम एक्सप्रेस ,विदर्भ एक्सप्रेस ,गोरखपुर एक्सप्रेस , देवगिरी व नागपुर दुरांतो एक्सप्रेस या गाड्याना फटका बसला . 

काम पूर्ण झाले तरी कल्याण ते कसारा रेल्वे सेवा उशिरा 

पहाटे 5 च्या सुमारास आंबिवली रेल्वे गेट वर वाळूच्या डंपरने धडक आणि दुरुस्ती नंतर रेल्वे सेवा पूर्वरत झाली तरी कल्याण ते कसारा अर्धा ते पाऊण तास लोकल सेवा उशीरा धावत असल्याने कसारा, आसनगाव, खडवली, वासींद, टिटवाळा, शहाड, आंबिवली रेल्वे स्थानक मध्ये रेल्वे प्रवासी वर्गाची तोबा गर्दी झाली होती. 

टिटवाळा ते कल्याण 100 ते 200 रुपये रिक्षा भाडे 

रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने नेहमी प्रमाणे रिक्षा चालकांनी टिटवाळा ते कल्याण रेल्वे स्थानक 100 ते दिडशे रुपये भाडे घेत प्रवासी वर्गाची लूटमार केली. 

पुन्हा एकदा रेल्वे च्या भोंगळ कारभार मुळे प्रवासी वर्गाला नवीन वर्षात ही त्रास सहन करावा लागणार आहे त्यासोबत आंबिवली गेट जवळील कल्याण डोंबिवली महानगर पालिका धीम्या गतीने उड्डाण पूल बनवीत असल्याने आज प्रवासी वर्गाला त्रास सहन करावा लागला याबाबत राज्य सरकार ने त्वरित लक्ष्य घालायला हवे अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना श्याम उबाळे यांनी केली आहे . 

वाळूच्या डंपर ने आंबिबली गेट ला धडक दिली कसारा रेल्वे सुरक्षा बलाने डंपर आणि चालकाला ताब्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केले आहे .6 वाजून 10 मिनिटाला कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान सेवा पूर्वरत झाली असली 10 ते 15 मिनिटं कल्याण ते कसारा दरम्यान लोकल सेवा उशिरा धावत असली तरी काही काळात ती पूर्व पदावर येईल अशी माहिती मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

SCROLL FOR NEXT