Anand Paranjape and CM Eknath Shinde
Anand Paranjape and CM Eknath Shinde Sakal
मुंबई

Kalyan Loksabha : "तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागू शकतो", राष्ट्रवादीचे प्रवक्ते परांजपे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेंना आवरावे. अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला वाटत असेल की, कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो, हे लक्षात ठेवावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तिस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल की, रायगड लोकसभा असेल यांच्यावर वारंवार टीका-टिपणी करत असतात.

माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, आपल्या नेत्यांना आवरावे अन्यथा आम्ही राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आमच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ले करत आहेत. त्यात कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे. तर कल्याण लोकसभेत वेगळा निकालदेखील लागू शकतो. हे ध्यानात ठेवावे.

त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगले वातावरण रहावे, असे जर माननीय मुख्यमंत्रांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर, शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावे, त्यांना योग्य ती समज द्यावी. आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तिस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेत देखील वेगळा निर्णय आणि वेगळे चित्र दिसू शकते, एवढेच यानिमित्ताने सांगतो असा इशारा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला.

२०१९ ला लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामती मतदारसंघात विजय झाला. सातत्याने बारामती मतदारसंघात विकास कामांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिलेला आहे. याहीवेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ येथुन निश्चित विजयी होईल. विजय शिवतारे त्यांचा वैयक्तिक अजेंडा चालवित असतील तर त्यांना योग्य ती समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे, असे देखील परांजपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT