Lata Shinde and Pappu Kalani sakal
मुंबई

Loksabha Election : डॉ. शिंदे यांच्या विजयाच्या हाकेसाठी त्यांची आई लता शिंदे उल्हासनगरात; पप्पू कलानी कुटुंबियांची घेतली भेट

महायुतीचे कल्याण लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या हाकेसाठी त्यांची आई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी उल्हासनगरात धाव घेतली.

दिनेश गोगी

उल्हासनगर - महायुतीचे कल्याण लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाच्या हाकेसाठी त्यांची आई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी उल्हासनगरात धाव घेतली असून, त्यांनी पप्पू कलानी कुटुंबियांची भेट घेतली आहे. लता शिंदे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे, युथ आयकॉन ओमी कलानी यांच्या दोस्ती का गठबंधनचे कौतुक केले आहे.

लता शिंदे यांनी कलानी महालात पप्पू कलानी, ओमी कलानी, पंचम कलानी, टीम ओमी कलानीचे कमलेश निकम, मनोज लासी, संतोष पांडे, अश्विनी निकम आदींची भेट घेतली.

शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आठवले गट-पीआरपी-साईपक्ष, बहुतांश व्यापारी, आदी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सोबत आहेत. अशातच ओमी कलानी यांनी त्यांच्या टीम ओमी कलानीच्या वतीने डॉ. शिंदे यांना समर्थन दिलेले आहे. त्यासाठी त्यांनी दोस्ती का गठबंधन असा आगळावेगळा मॅसेज दिलेला असून त्यासाठी 5 हजार स्टिकर्स वाहनांवर चिकटवण्यात आले आहेत.

या दोस्ती का गठबंधनचे लता शिंदे यांनी कौतुक केले असून ज्या रीतीने सर्वच पक्ष डॉ. शिंदे यांच्यासाठी एकवटल्याचे बघून उल्हासनगरातून मोठ्या प्रमाणावर लीड मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

कलानी कुटुंबिया नंतर लता शिंदे यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर महाराज, युवासेनेचे जिल्हा सचिव विक्की भुल्लर, भाजपचे महेश सुखरामानी, दीपक छतलानी, फर्निचर बाजारातील व्यापारी आदींच्या भेटी घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : ''९० व्या वर्षीही मी काम करायचं का?'', पुण्यातील 'त्या' पोस्टरवरून संतापले अण्णा हजारे...दिलं चोख प्रत्यूत्तर!

MS Dhoni भारतीय संघाचा कोच होणार? चर्चेला उधाण; माजी क्रिकेटर म्हणतोय, कठीण काम...

Mutual Fund: म्युच्युअल फंडमध्ये नुकसान होतयं? तुम्ही 'या' चुका करत आहात का?

Latest Marathi News Updates : आशिया कप हॉकी स्पर्धेच्या लोगो अन् ट्रॉफीचे अनावरण; बिहारमध्ये रंगणार स्पर्धा

Parner Fraud:'पेट्रोलपंप देण्याच्या बहाण्याने २३ लाख रुपयांची फसवणूक'; पारनेर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT