Sulbha Gaikwad sakal
मुंबई

Sulbha Gaikwad : राजकीय कोणताही हेतू नाही, आमदारांच्या अनुपस्थितीत मी गेले होते; सुलभा गायकवाड यांनी सांगून टाकले

ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर व नेते संजय राऊत यांच्या गाडीत गायकवाड या बसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात असलेल्या एका कार्यक्रमास शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आले होते. याच कार्यक्रमास भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या देखील आल्या होत्या.

दरम्यान ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर व नेते संजय राऊत यांच्या गाडीत गायकवाड या बसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. दरम्यान सुलभा गायकवाड यांनी यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. आमदार गायकवाड यांच्या अनुपस्थितीत मला जे काम करायचे ते मी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवारातील आम्ही असून त्यांच्या विजयासाठी काम करत आहोत.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात एका धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आले होते.

कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना देखील या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे त्या देखील या कार्यक्रमास आल्या होत्या. दरम्यान ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सुलभा गायकवाड या देखील त्यांच्या गाडीत असल्याने त्या वैशाली दरेकर यांच्या पाठीशी आहेत का याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मात्र काही तासातच सुलभा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलून आपले म्हणणे मांडले आहे. सुलभा गायकवाड म्हणाल्या, यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता. आमदार गणपत गायकवाड यांचा कल्याण पूर्व हा मतदार संघ असून त्यांच्या अनुपस्थितीत विविध कार्यक्रमांना मी जात असते.

मला बोलावणे आल्यामुळे गोरपे गावात आज मी गेले होते. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात मंदिराचा जिर्णोद्धाराचा कार्यक्रम होता. त्यासाठी मला आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता किंवा प्रचार नव्हता. आमदारांच्या अनुपस्थितीत मला जे काम करायचे ते मी करत आहे. त्या हेतूने मी तिकडे गेले होते.

महाविकास आघाडीच्या दरेकर या येथील उमेदवार आहेत. तर त्या बोलणारच यांचा पाठिंबा आहे. आमचा कोणाला पाठिंबा नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परिवार आहोत. त्यांच्यासोबतच राहणार आणि मोदी साहेबांना निवडून आणणार असे सुलभा यांनी सांगितले.

तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील त्या धार्मिक कार्यक्रमाला आलेल्या आहेत. हा राजकीय कार्यक्रम नाही, धार्मिक कार्यक्रम आहे. त्या स्वतः आमच्याबरोबर होत्या. त्यांचे पती तुरुंगत आहेत. पोलीस त्यांच्या मागे लागलेले आहेत. ते भाजपचे आमदार आहेत. आमच्या पक्षाचे आमदार नाहीत. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ते जवळचे आहेत. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...

Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT