Mahesh tapase kalyan loksabha  sakal
मुंबई

Hemant Patil: वर्षा बंगला सत्तेच केंद्रस्थान बनलाय? हेमंत पाटलांच्या शक्तीप्रदर्शनावरून विरोधकांचे टीकास्त्र

हेमंत पाटलांचे शक्तीप्रदर्शन किती योग्य निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे - महेश तपासे |Election Commission should answer how Hemant Patal's show of power is right - Mahesh tapase

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Kalyan Dombivali News: महायुतीत जागा वाटपावरुन अनेक उलथापालथी सुरु असून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बैठकांचे सत्र जोरदार सुरु आहे. यावरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, महाराष्ट्रातील वर्षा बंगला हा सत्तेचा केंद्रस्थान आहे.

या शासकीय बंगल्यावर खऱ्या अर्थाने पाहीले तर तिकडे राजकारण सुरु झालेले आहे. हे राजकारण योग्य नाही. तुम्हाला पक्षाच्या बैठका घ्यायच्या तर पक्ष कार्यालयात घ्या. वर्षा बंगल्यावर हेमंत पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करणे किती योग्य आहे याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहीजे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरेकर यांची गुरुवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने भेट घेत अभिनंदन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, काशिनाथ पाटील, प्रकाश तरे, मधुकर माळी, सुरय्या पटेल, संगीता मोरे, प्रकाश चव्हाण, विजय मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महेश तपासे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला असल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षातील महायुतीत सुरु असलेल्या जागावाटपाच्या गोंधळावर त्यांनी ताशेरे ओढले. एवढी मोठी नामुष्की मुख्यमंत्र्यांच्या पक्षावर येते हिंगोलीचा उमेदवार जाहीर करतात.

चोवीस तासात त्याच नाव कट करतात. विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट डावलतात. त्या एकट्याच नाही तर त्यांचे तीन चार उमेदवार आहे त्यात फेरबदल केलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला वर्षा बंगला हा सत्तेचा केंद्रस्थान आहे. या शासकीय बंगल्यावर खऱ्या अर्थाने पाहीले असेल तर तिकडे राजकारण सुरु झालेले आहे. हे राजकारण योग्य नाही. तुम्हाला पक्षाच्या बैठका घ्यायच्या तर पक्ष कार्यालयात घ्या, वर्षा बंगल्यावर हेमंत पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करणे किती योग्य याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहीजे असे तपासे म्हणाले.

तसेच उमेदवार वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याविषयी ते म्हणाले, एका भगिनीला उमेदवारी देणे हे एक फार मोठा पुरोगामी पाऊल उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने उचलल आहे. ते पण एका राज्य सरकारच्या राजकुमारा विरोधात त्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोणी काही जरी म्हटल तरी या जागेवर मोठा रणसंग्राम होणार. दोन दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांनी वक्तव्य केले कार्यकर्त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नये.

याचा अर्थ त्यांनाही माहित आहे की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपण जाता कामा नये आपल्याला पाय जमिनीवर ठेवून काम करावे लागेल. त्यांनी चांगल काम केले असेल तर लोक त्यांच्या बाजूने राहतील. वीस एक लाख मतदार या मतदार संघात आहे. मतदारांत तीन पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्या पक्षाचे कार्यकर्ते सोडून गेले त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हा मतदारसंघ आहे. दुसरीकडे भारतीय संविधानाला मानणारा दुसरा मतदार आहे.

शेवटी राज्यातील शासनाची केस अजून थांबलेली नाही. सुप्रिम कोर्टाने त्या बंडाला क्लिन चीट दिले नाही. कालही अजित पवार यांच्या पक्षावर सुप्रीम कोर्टाने फार मोठे ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे विद्यमान सरकारच्या अस्मितेबद्दल, घटनात्मक प्रात्रतेबद्दल अजूनही निर्णय प्रलंबित आहे. तो लोकसभेनंतर लागू शेकतो. शेवटी आपण एखादा उमेदवार निवडून देताना सर्वसामान्य निवडून देतो. एका भगिनीला निवडून देत आहोत याचा अभिमान वाटावा या दृष्टीकोनातून वैशाली यांची निवड योग्य आहे असे वाटत असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT