मुंबई

Kalyan Politics: ठाकरे गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला देखील माणस मिळणार नाहीत - दीपेश म्हात्रे

पक्षाच्या नेतृत्वाला येथे यावे लागते हीच मोठी शोकांतिका

शर्मिला वाळुंज

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक आपली जागा शोधण्याच काम करत आहेत. त्यांना नवीन कार्यकर्ते, लोक मिळत नाहीत. ते शोधण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाला येथे यावे लागते हीच मोठी शोकांतिका आहे असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटाला टोला हाणला आहे. त्या गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला देखील माणस मिळणार नाहीत असे सांगत त्यांनी युवानेते आदित्य यांना प्रतिउत्तर देऊ केले आहे.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथील शिवसेनेच्या शाखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सडकून टिका करत भाजप मंत्री, आमदार यांचा खरपूस समाचार घेतला. आता मला कोल्ड कॉफी कोण देणार असे म्हणत त्यांनी खासदार शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

आम्ही त्यांच्या गाडीमध्ये कोल्ड कॉफी ठेवायचो, सँडविच ठेवायचो, असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका पत्रकार परिषद घेत केली होती. याचं मुद्द्यावरुन कल्याण येथे आदित्य यांनी खासदार श्रीकांत यांना हसत हसत टोला लगावत म्हणाले की एक सर्व्हे आला आहे. त्यातून मला एक गोष्ट कळली विद्यमान खासदार आहॆत ना, जे मला कोल्डकॉफ़ी द्यायचे..आज येताना मी तेच विचार करत होतो मला कोल्ड कॉफी कोण देणार ? असे हसत ठाकरे म्हणाले.

याला शिवसेना शिंदे गटाकडून शुक्रवारी उत्तर देण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्य युवासेना सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले, ठाकरे गटाची लोक जागा शोधण्याचे काम करत आहेत. त्यांना नविन कार्यकर्ते मिळत नाहीं, लोक मिळत नाही. कार्यकर्ते शोधण्यासाठी पक्ष नेतृत्वाला इथे यावे लागेत. हीच मोठी शोकांतिका आहॆ.त्यांना आता कॉफी आणि सॅन्डविच द्यायला माणसं मिळणार नाहीत.

कल्याण लोकसभेचा इतका विकास झालेला आहे की इथले सर्व स्थानिक भूमिपुत्र लोकप्रतिनिधी असेल ते श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. काल विकासावर सोडून फक्त गद्दार, खोके यावरच गोष्टी केल्या. अनेक वर्षापासून ते येथे सत्तेत होते. पण विकासाबद्दल एक शब्द त्यांच्या तोंडातून निघाला नाही. आपण विकासावर बोलावं खासदार शिंदे यांनी या भागात केलेला जो विकास आहे त्याच्यावर बोलावं. कोल्ड कॉफी आणि सँडविच बोलून सहानुभूती मिळवण्याचं काम करू नये त्यांनी.

पोस्टर बॅनर हे कार्यकर्ते त्यांच्या मनापासून लावत असतात. कोणताही नेता त्यांना सांगत नाही की पोस्टर बॅनर लावा. तीन-तीन वेळा ठाकरे गटाच्या पक्ष नेतृत्वाला या कल्याण लोकसभेमध्ये स्वतः यावं लागतं. तर आपण त्यांची ती जागा शोधण्याचा प्रयत्न करत आहात. कार्यकर्ते मिळत नाही ते शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडे जे कार्यकर्ते आहेत ते काय काम करतात हे आपल्याला देखील माहित आहे असे म्हात्रे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT