Kalyan Railway Police Mumbai Jalgaon arrested  sakal
मुंबई

Mumbai Crime News: जळगावहून पळाला कल्याण रेल्वे पोलिसांनी पकडले; खुनाच्या कटातील आरोपीस कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक

मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बापाने मुलाच्या मित्रासोबत कट रचला. सोमवारी सकाळी 11 च्या दरम्यान बुरखा परिधान करीत ते जळगाव कोर्ट परिसरातील मंदिराजवळ बसले होते.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - मुलाची हत्या करणाऱ्या आरोपींना संपविण्याचा कट बापाने रचला होता. आरोपींना संपविण्यासाठी बुरखा घालून बाप एका मित्रासह कोर्टात गेला.

पोलिसांनी बापाचा कट उधळून लावत अटक केली. परंतु त्याचा साथीदार सुरेश इंधाटेने तेथून पळ काढला. पळून जाण्याकरीता त्याने जळगाव रेल्वे स्थानकातून मंगला एक्सप्रेस पकडली.

मंगला एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात येताच कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात तो सापडला. बॅग तपासताना त्याच्या बॅगमध्ये गावठी पिस्तुल सापडल्याने या गुन्ह्याचा उलगडा झाला.

दोन वर्षापूर्वी एका हत्येच्या प्रकरणात धम्मप्रिय हा तरुण जेलमधून सुटून आला होता. धम्मप्रियने ज्या तरुणाची हत्या केली होती त्या तरुणाच्या साथीदाराने धम्मप्रियची गोळ्या घालून नशिराबाद येथे 21 सप्टेंबर 2022 रोजी हत्या केली.

ही हत्या धम्मप्रिय सुरळकर याचे वडील मनोहर यांच्या समोरच करण्यात आली होती. या प्रकरणातील संशयित आरोपींना कोर्टात हजर केले जाणार होते. याची माहिती हत्या झालेल्या तरुणाच्या वडिलांना मिळाली होती.

मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बापाने मुलाच्या मित्रासोबत कट रचला. सोमवारी सकाळी 11 च्या दरम्यान बुरखा परिधान करीत ते जळगाव कोर्ट परिसरातील मंदिराजवळ बसले होते.

त्यांना पाहून पोलिसांच्या एका खबऱ्याला संशय आला. त्याने याबाबतची माहिती शहर पोलिस स्थानकाला दिली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी यांनी कारवाई करत मनोहर याला कोर्ट परिसरातून अटक केली होती. यावेळी सुरेश तेथून पळ काढण्यास यशस्वी झाला होता.

पोलिसांनी सुत्र हलवित त्वरीत सुरेशचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुरेश हा मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लोहमार्ग पोलिस अलर्ट झाले होते.

कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस कल्याण स्थानकात मंगला एक्सप्रेस आल्यानंतर ट्रेन मध्ये प्रवाशांची झडती घेत होते. यावेळी सुरेश याच्या बॅगची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तुल आणि 4 काडतुसे आढळून आली.

सुरेश याला ताब्यात घेतले असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT