mumbai railway esakal
मुंबई

कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा

लाईनमनच्या सतर्कतेमुळे टळला मध्य रेल्वेवरील अपघात

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : ठाकुर्ली कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान पत्रिपुलाजवळ जलद मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सकाळी 6.30 वाजता लाईनमन हिरालाल आणि मिथुनकुमार यांच्या लक्षात ही बाब आली. समोरुन वेगाने इंद्रायणी एक्सप्रेस वेगाने येत असल्याचे पाहून मिथून यांनी लाल सिग्नल धावत मोटरमनला धोक्याची सूचना दिली. प्रसंगावधान राखत एक्सप्रेस थांबविण्यात आली. लाईनमन यांनी ही बाब तातडीने वरिष्ठांना कळविली. त्यानंतर मुंबईहून कल्याणकडे येणारी लांब पल्ल्याची वाहतूक पाऊण तास बंद ठेवण्यात आली होती. ही बाब वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

ऐन सकाळच्या वेळी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसला. अनेक लोकल या उशीराने धावत होत्या.मंगळवारी सकाळी पत्रीपुला पासून काही अंतरावर डाऊन जलद मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती कर्तव्यावर तैनात असलेले लाईनमन हिरा लाल आणि मिथुन कुमार यांच्या लक्षात आली. समोरून इंद्रायणी एक्सप्रेस वेगात येत असल्याचे पाहून मिथुन कुमार यांनी ताबडतोब लाल सिग्नल देऊन ट्रेनच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत हिरालाल यांनी घटनास्थळाचे संरक्षणाचे काम पाहीले. तसेच त्यांनी ही माहिती तांत्रिक विभागाच्या वरिष्ठांना दिली.

तांत्रिक विभागाचे दुरुस्ती पथक तातडीने घटना स्थळी येऊन त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. तोपर्यंत सकाळच्या वेळेत पुणे, नाशिक दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस, कर्जत, कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल ठाकुर्ली, डोंबिवली, दिवा, मुंब्रा परिसरात खोळंबल्या होत्या. पाऊण तास एकही लोकल् रेल्वे स्थानकात न आल्याने डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, कोपर, मुंब्रा, ठाणे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. सकाळी कामावर जाण्याची घाई असलेल्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसला.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. सव्वा सातच्या दरम्यान काम पूर्ण करत रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र या खोळंब्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. सर्वच लोकल अर्धा ते पाऊण तास उशीराने धावत असल्याने अनेक चाकरमान्यांना कार्यालयात लेट मार्क पडला. रुळाला तडा गेल्याची माहिती वेळीच समजली नसती तर मोठा अपघात याठिकाणी घडला असता, अशी माहिती रेल्वे सुत्रांनी दिली आहे. लाईनमन हिरालाल आणि मिथुन कुमार यांच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळल्याने त्या कामगाराचे रेल्वेच्या वरिष्ठांनी कौतुक करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT