मुंबई

कांजूरमार्ग कारशेड प्रकरण | न्यायालयाच्या निर्णयाने ठाकरे सरकारला चपराक; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

तुषार सोनवणे

मुंबई -  कांजुरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज एमएमआरडीएला दिले असून जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे मेट्रो कारशेड प्रकल्पाला तूर्तास खीळ बसला आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही कांजूरमार्ग कारशेड चा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले होते. आज न्यायालयाने एमएमआरडीएला काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर फडणवीस यांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ' राज्य सरकारने एमएमआरडीएला कांजूरमार्गची जागा देण्याच निर्णय चुकीचा आहे. सरकारने तयार केलेल्या सौनिक समितीच्या अहवालातही नमूद करण्यात आले होते की,  फक्त अहंकारामुळे एमएमआरडीएला जागा देण्याचा आदेश काढण्यात आला. संबधित जागा कालही विवादात होती, आजही आहे. आता तर खुद उच्च न्यायालयाने तेथील काम थांबवण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढे या ठिकाणी काम होऊ शकत नाही.  '

' जरी ती जागा विवादीत नसली तरी, सौनिक समितीच्या अहवालानुसार त्या जागी मेट्रो कारशेड उभाऱण्यास 4 ते 5 वर्षाचा विलंब होऊ शकतो. आरेतील जागेला सर्वोच्च न्यायालयानेही मंजूरी दिली आहे. आरेतील मेट्रो कारशेड हे हरित पॅटर्नवर आधारीत असल्याने त्याठिकाणी पर्यावरणाची हानी होत नाही.  ठाकरे सरकार आपल्या अहंकारामुळे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचे काम करीत आहे. त्यामुळे सरकारने अहंकार सोडावा. सर्वोच्च न्यायालयाने आरेच्या जागेला मान्यता दिली आहे. मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत लवकरात लवकर आणायची असेल तर, आरेत ग्रीन कारशेड उभारावे ही आमची मागणी आहे ' . अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी मांडले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT