kdmc
kdmc  
मुंबई

कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ; पालिकेला खासगी डॉक्टरांसह कोव्हिड लॅबची गरज..

सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दीत प्रतिदिन रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना चाचणीसाछी खासगी लॅबसह रुग्णांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयातील डॉक्टर वर्गाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राज्य शासनाकडे मदतीची मागणी केली आहे .
 
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत कोरोना बाधितांची संख्या 2 हजारांहून अधिक झाल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार वैद्यकीय आरोग्य विभागाने सर्वेक्षणावर जोर दिला आहे. आतपर्यंत 2 लाख 94 हजार 218 घरांचे सर्वेक्षण झाले असून आतापर्यंत 8 हजार 881 नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. यातून 2 हजार 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 6 हजार 237 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच 200 हून अधिक नागरिकांचे अहवाल येणे बाकी आहे. 

सद्यस्थितीत पालिकेने कोरोना चाचणी केल्यानंतर त्याची तपासणी करण्यासाठी नमुने मुंबईमधील हाफकीन येथे पाठविले जात आहेत. यात अधिक वेळ जात असल्याने अहवाल जलद गतीने मिळावा यासाठी जे. जे. रुग्णालयामधील लॅब मधून मदत मिळावी अशी मागणी राज्य शासनाला आयुक्त सूर्यवंशी यांनी केली आहे. तसेच रुग्णांवर उपचार करताना पालिकेवर भर पडत असल्याने खासगी रुग्णालये व डॉक्टरांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

गरिबांची मोफत तपासणी: 

कल्याण पूर्वतील आनंदवाडी हा दाट लोकवस्तीचा परिसर असून येथे गरीब आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. या सर्वांनी कोव्हिड टेस्ट करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याची व्यथा माजी नगरसेवक प्रमोद पिंगळे यांनी मांडली असता आयुक्तांनी संबधित नागरिकांची कोव्हिड तपासणी मोफत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मागील 15 दिवसात 100 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

KDMC wants private doctors and covid testing labs 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT