मुंबई

केडीएमटीच्या खासगीकरणाला वेग 

सकाळवृत्तसेवा

कल्याण - केडीएमटी खासगीकरणाच्या प्रस्तावास विधी विभागाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव परिवहन समितीसमोर सादर करून तो मंजूर करून पाठवण्याचे आदेश पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहेत. यामुळे केडीएमटी कर्मचारी, अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून 23 मे 2018 रोजी केडीएमटी वाहतुकीला सुरुवात झाली. मात्र सध्या उत्पन्नात झालेली घट, थकबाकी आणि इंधन दरवाढ यामुळे केडीएमटीला घरघर लागली आहे. पालिकेकडून अनुदान देऊनही उपन्न वाढ होत नसल्याने पालिका पदाधिकाऱ्यांनी केडीएमटीचे खासगीकरण करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी केडीएमटी विभागाची आढावा बैठक घेऊन खासगीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला होता. 

हा प्रस्ताव केडीएमटी प्रशासनाने दिल्यानंतर त्याबाबत विधी विभागामार्फत अभिप्राय मागितला असता, केडीएमटी खासगीकरणाला विधी विभागाने अनुकुलता दर्शवली आहे. पालिकेने केडीएमटी कर्मचारी, अधिकारी वर्गाची थकबाकी द्यावी, दायित्व घ्यावे तसेच ठेकेदारांची थकबाकी द्यावी; अशी शिफारस करण्यात आली आहे. विधी विभागाने अनुकुलता दर्शवल्याने केडीएमटीच्या खासगीकरणाला गती येणार आहे. 

खासगीकरण करण्यापूर्वी विधी विभागाचा अभिप्राय महत्वाचा असतो. अभिप्राय अनुकुल आला असून आता खासगीकरणाचा अंतिम प्रस्ताव परिवहन समितीसमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रस्ताव महासभेपुढे सादर केल्यानंतर त्याला मंजुरी मिळताच खासगीकरणाबाबत अंमलबजावणी केली जाईल. 
- गोविंद बोडके, पालिका आयुक्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT