kedar dighe and modi  sakal
मुंबई

Thane Politics: दिघेंच्या पुतण्याची PM मोदींवर टीका; म्हणाले, ओरिजनल शिवसेना....

सकाळ वृत्तसेवा

Thane News: प्रधानमंत्री मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख नकली शिवसेना केल्यानंतर आता शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

जेव्हा ओरिजनल शिवसेना भाजपसोबत होती तेव्हा भाजपला पक्ष फोडावे आणि चोरावे लागत नव्हते. आता चोरलेली शिवसेना सोबत असतानाही तुम्हाला फोडलेली राष्ट्रवादी का लागते? असा सवालच केदार दिघे यांनी भाजपला ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी महाराष्ट्रात प्रचार सभा घेताना ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करताना ही शिवसेना नकली असल्याचे म्हटले होते याचे पडसाद आता शिवसैनिकांमधून उमटू लागले असून ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी भाजपच्या केंद्रातील नेत्यांचा चांगला समाचार घेतला आहे.

याबाबत त्यांनी खरमरीत केले असून जर ठाकरेंच्या शिवसेनेला मोदी आणि शहा नकली शिवसेना म्हणतात तर मग आता चोरलेली शिवसेना सोबत असताना भाजपला फोडलेली राष्ट्रवादी का लागते जेव्हा ओरिजनल शिवसेना तुमच्या सोबत होती तेव्हा तुम्हाला अशा फोडलेल्या पक्षांची गरज कधीच भासत नव्हती यातच सर्व स्पष्ट होते.

ओरिजनल शिवसेना ठाकरेंची शिवसेना अशा आशयाचे ट्विट ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी सोशल मीडिया एक्स वर केले आहे.

शिवसेना पक्ष फोडून गद्दारांना भाजपने सोबत घेतले आणि त्यांना शिवसेना नाव आणि चिन्ह दिले. मात्र ओरिजनल शिवसैनिक हे मातोश्री सोबत एकनिष्ठ असल्याचे केदार दिघे यांनी म्हटले आहे. जे डुबलीकेट आणि चोरलेला माल होता तो आता भाजपच्या दावणीला बांधला गेला आहे, असाही हल्लाबोल केदार दिघे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Case: सुप्रीम कोर्टानेही मानलं शिवसेना ठाकरेंची? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादातून नेमकं काय समोर आलं? ते 11 मुद्दे काय?

Real Estate Revenue: बांधकाम क्षेत्राला अच्छे दिन! चार महिन्यांत मुद्रांक विभागाचा महसूल २१,९२८ कोटींवर; १७ टक्क्यांनी वाढ

Koyna Dam Water Level : कोयना धरणातील पाणीसाठा चार दिवसांपासून 92 टीएमसीवर स्थिर; महाबळेश्वर, नवजा, कोयनानगरमध्ये किती पाऊस?

Marathi News Live Updates : पुण्यासह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, कोकणासाठी आज यलो अलर्ट जारी

Tukaram Mundhe: अ‍ॅनालॉग पनीर बंदीवर तुकाराम मुंढेंचे स्पष्टीकरण, सावजीबाबत माफीचा प्रश्नच नाही

SCROLL FOR NEXT