मुंबई

KEM रुग्णालयात मृतदेह व्यवस्थापन प्रशिक्षण; कोरोनाबाधेच्या धोक्यामुळे उपक्रम

भाग्यश्री भुवड

मुंबई, ता. 25 : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृतदेहांची योग्य पद्धतीने हाताळणी होत नसल्याच्या अनेक तक्रारी वेगवेगळ्या रुग्णालयांतून आल्या आहेत. या मृतदेहांतून विषाणू संसर्ग होण्याची शक्यता ध्यानात घेऊन केईएम रुग्णालयाने कर्मचाऱ्यांसाठी मृतदेह व्यवस्थापन प्रशिक्षण सुरू केले आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या मृतदेहातून निघणाऱ्या स्त्रावांमुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लागण होऊ शकते. हा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातर्फे कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे. कोरोनाच्या रुग्णाचा मृतदेह कसा हाताळायचा, याचे प्रशिक्षण सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले जात आहे. महापालिका रुग्णालयात असा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. हे प्रशिक्षण 2 मेपर्यंत सुरू राहणार आहे. मानसिक ताणतणावांचे व्यवस्थापन, पीपीई किट्सचा वापर, कोरोनाबाबत माहिती आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले.

कोरोनाबाधिताच्या मृतदेहाचे पॅकिंग कसे करायचे याबाबत आरोग्य सेवेतील कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका आणि मृताच्या कुटुंबीयांनाही माहिती असणे आवश्यक आहे. मृतदेह गुंडाळण्यासाठी 200 मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिकचा वापर करावा. जंतूनाशक फवारणी करूनच मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला जावा. सध्या फक्त दोन व्यक्ती असे मृतदेह हाताळत असून, त्यांना पीपीई किट देण्यात आले आहेत. 

केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार कोरोनाच्या रुग्णांचे मृतदेह हाताळले जात आहेत. मृतदेह व्यवस्थापनाबाबत जास्तीत जास्त माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अशा पद्धतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. - डॉ. रवींद्र देवकर, प्राध्यापक (अतिरिक्त), न्यायवैद्यक शास्त्र विभाग, केईएम रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT