Kirit-Somaiya Enquiry INS Vikrant Case
Kirit-Somaiya Enquiry INS Vikrant Case  sakal media
मुंबई

FIR वर सही नव्हती, खार पोलिसांनीदेखील केलं मान्य : सोमय्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : खार पोलीस ठाण्यात दाखल FIR वर माझी सही नव्हती, हे खार पोलिसांकडून मान्य केले आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी उद्धव ठाकरेंच्या सांगण्यानुसार माझी एफआयआर घेण्यास नकार दिल्याचे ते म्हणाले. खार पोलिसांनी याआधीच कारवाई सुरू केली होती. या संदर्भात उद्या राज्यपालांची भेट घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. एफआयआरवर माझी स्वाक्षरी नाही. त्यामुळे ती एफआयआर खोटी असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.(Khar Police Agreed FIR Was Not Signed )

पोलीस आयुक्तांनी वेबसाईटवर टाकलेल्या एफआय़आरवर सोमय्यांची सही नसल्याचं खार पोलिसांनी म्हटले असून, पोलीस आयुक्तांविरोधात चौकशी झाली पाहिजे असे सोमय्या म्हणाले. मुंबई पोलीस आय़ुक्तांच्या गाईडन्सनुसार माझ्यावर गुंडांचा हल्ला झाल्याचेही ते म्हणाले.मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी खोटी तक्रार दाखल केली. ती खार पोलिसांना देण्यात आली. खार पोलिसांकडे मी अधिकृत एफआयआर कॉपी मागितली. त्यावर माझी सही नसल्याचे खार पोलिसांनी मान्य केलं आहे, असेही यावेळी सोमय्यांनी सांगितले आहे.

आयपीसी १५४ अंतर्गत माझी सही घेणं आवश्यक होतं. मुंबई पोलिसांना फोन आला म्हणून ते कागद फाडून टाकल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी प्रांगणात माझ्यावर हल्ला केल्याचे सोमय्या म्हणाले. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर 23 एप्रिल रोजी हल्ला झाल्यानंतर दोन्ही पक्षांतला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. हल्ल्यानंतर सोमय्यांनी मुंबई पोलीस आपला FIR घेत नसल्याचे म्हणत वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. तसेच यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांनी खोटा एफआयआर दाखल केल्याचा आरोप केला असून, त्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT