Kirit Somaiya after IT Raid on Yashwant Jadhav sakal media
मुंबई

यशवंत जाधवांवर IT चा छापा पडताच सोमय्यांकडून नवी यादी जाहीर

ओमकार वाबळे

मुंबई महापालिकेच्या (BMC) स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने यामागे राजकीय षडयंत्र असल्याचं सेनेच्या नेत्यांनी म्हटलंय. त्यामुळे शिवसेनेचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवाब मलिकांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच केंद्रीय यंत्रणांचे छापे पडत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. (Income Tax Raid on Yashwant Jadhav)

आता किरीट सोमय्यांनी नव्या भ्रष्टाचारी नेत्यांची यादी जाहीर केल्यामुळे काँट्रोव्हर्सीत भर पडली आहे. त्यातच सोमय्या दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. राज्यातील भ्रष्ट नेत्यांविरोधात दिल्लीत काही अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. किरीट सोमय्या यांनी 6 जानेवारीला यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि त्यांच्या मुलाबाबत तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई झाल्याचं कळतंय. (Kirit Somaiya)

किरीट सोमय्या यांनी काल महाविकास आघाडी सरकारच्या १२ नेत्यांची यादी जाहीर केली होती. डर्टी डझन्स असं त्यांनी संबोधलं होतं. आणि या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगितलं. यामध्ये जाधव यांचं नाव नव्हतं. आता स्थायी समितीच्या अध्यक्षावरच आयकर विभागाचा छापा पडल्यानंतर सोमय्यांनी नवी यादी जाहीर केली आहे.

यामध्ये यशवंत जाधव, मुंबईच्या महपौर किशोरी पेडणेकर आणि यामिनी जाधवांच्या नावांचा समावेश आहे. याआधी सोमय्यांनी बारा नेत्यांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनिल परब,संजय राऊत, सुजीत पाटेकर, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या नावांचा समावेश आहे.

कोण आहेत यशवतं जाधव?

यशवंत जाधव हे शिवसेना उपनेते आहेत . बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आहेत . त्यांच्या पत्नी यामिनी यशवंत जाधव या भायखळा मतदार संघाच्या आमदार आहेत

राजकीय कारकीर्द -

  1. १९९७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड

  2. २००७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले

  3. २००८: बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षपदी निवड

  4. २०११ नंतर: उपनेते, शिवसेना

  5. २०१७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत पुन्हा नगरसेवक म्हणून निवड

  6. २०१७: बृहन्मुंबई महानगरपालिकेत सभागृह नेते म्हणून नियुक्ती

  7. २०१८: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड , एप्रिल २०१८ पासून यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्ष आहेत , ही स्थायी समिती अध्यक्ष पदाची त्यांची ३ टर्म आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT