Kirit Somaiya vs Kishori Pednekar esakal
मुंबई

Kishori Pednekar : मला बदनाम करण्याचा प्रयत्न, मी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही; पेडणेकरांचं सोमय्यांना चॅलेंज

'किरीट सोमय्यांकडून सतत गरिबांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'किरीट सोमय्यांकडून सतत गरिबांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे.'

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी SRA वरळी इथं राहतं असं सांगितलं.

मुंबई महापालिकेनं (Mumbai Municipal Corporation) त्यांची चौकशी केली. त्यातून महापालिकेनं अहवाल दिला की, पेडणेकर यांनी घुसखोरी करून ताबा घेतला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सडेतोड उत्तर दिलंय.

पेडणेकर म्हणाल्या, घर असणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. कारण, नसताना गरिबांना त्रास दिला जातोय. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. ज्या घराचा माझा 11 महिन्यांपुरता संबंध असायचा, मग बाकीचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल त्यांनी केलाय.

आपल्याकडं त्याच्या अनेक केसेस प्रलंबित आहेत. त्याच्यावर सरकारचं कुठंलही निवदेन नाही. किरीट सोमय्यांकडून सतत गरिबांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. माझी बदनामी केली जात आहे, असा आरोप पेडणेकर यांनी सोमय्यांवर केला आहे.

सोमय्यांनी का केला आरोप?

“दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती. आता त्यांना 48 तासांत गाळा रिकामा करावा लागणार आहे. पेडणेकर यांनी अनेक गाळे ढापले आहेत, त्यांनी कोरोना काळातही पैसे कमावले आहेत. आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका केलीय. तसंच मुंबई पोलिसांत तक्रार केलीय. हा आदेश निघालाय. त्याच आधारावर मी मुंबई पोलिसांकडं पुन्हा पाठपुरावा करणार की किशोरी पेडणेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT