वडाची वाडी येथील आपल्या शेतात केळीचे घड दाखवताना सुरेश शेणॉय, बाळा मगर.
वडाची वाडी येथील आपल्या शेतात केळीचे घड दाखवताना सुरेश शेणॉय, बाळा मगर. 
मुंबई

आयटीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून धरली शेतीची वाट

सकाळ वृत्तसेवा

रोहा : मायानगरी मुंबापुरीतील वातानुकूलिन कार्यालयातील रग्गड पगाराच्या नोकऱ्या सोडून आयटी क्षेत्रातील उच्चपदस्य अधिकारी रायगड जिल्ह्यात शेती व्यवसायात उतरले आहेत. शेतीतून मानसिक समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले; तर जिल्ह्याभरात असे १०० ते १५० शेतकरी आयटी क्षेत्र सोडून शेती करीत असल्याचे बोलले जात आहे.

सध्या स्पर्धेच्या युगात जीवनात आनंद, समाधान अशा गोष्टींनाच माणूस मुकत चालला आहे. त्यामुळे सर्व सुखे पायाशी लोळण घेत असतानादेखील नैराश्‍याचे, भांडण, ताणतणावाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र सर्वच क्षेत्रात दिसून येते.

सध्या आयटी क्षेत्र म्हणजे बक्कळ पैसा देणारे क्षेत्र आहे. मात्र, कामाच्या दगदगीमुळे आयटीमधील अनेक कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्‍याचे प्रमाण वाढत चालले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी काहीजण अशा मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून इतर क्षेत्रात वळत असल्याचे दिसत आहे.

एकीकडे पारंपरिक शेती तोट्याचा व्यवसाय ठरत असताना अनेक उच्चशिक्षित तरुण शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहेत. पारंपरिक शेतीऐवजी तंत्रज्ञानाच्या आधारे वेगवेगळी पिके हा तरुणवर्ग शेतात घेत आहे. शेती फायद्यात आणायची असेल तर विक्री तंत्र आत्मसात करायला हवे.

भरघोस पीक आल्यास ते साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना तालुका स्थरावर शीतगृहांची सुविधा शासनाने पुरवल्यास कोणताही शेतकरी कधीही नुकसानीत जाणार नाही, असे शेती क्षेत्रात उतरलेल्या तरुणांचे म्हणणे आहे.

आयटी कंपनीतील व्यवस्थापक पदाचा राजीनामा देऊन वडाची वाडी येथे नऊ एकर जागेवर मी गेल्या पाच वर्षांपासून शेती करीत आहे. आयटीतील नोकरीतून मानसिक समाधान मिळत नव्हते. मातीतून पीक उगवताना पाहणे मला खूप आनंददायक वाटते. मी आतापर्यंत केळी, कलिंगड, हळद इत्यादी पिकांचे यशस्वी व्यवस्थापन केले आहे.
- सुरेश शेणॉय,
शेतकरी

गौळवाडी येथे नऊ एकर शेतात मी ऑर्किड फुलशेती, कलिंगड, हळद, पपई वगैरे पिके घेतो. आयटी कंपनीतील व्यवस्थापक पदाचा राजीनामा देऊन मी शेतीकडे वळलो.शेतीत शारीरिक श्रम असले तरी नवनिर्मितीचा आनंदही आहे. उच्चशिक्षित असल्याचा शेती क्षेत्राला काहीतरी फायदा व्हावा ही इच्छादेखील आहे.
श्रीनिवास सत्या
, शेतकरी

धगडवाडी गावात २० एकर जमिनीत वेगवेगळी पिके घेऊन शेती करीत आहे. शेतात दिवसा काम करून रात्री शांत झोपता येते. प्रदूषणरहित वातावरण याचेही आकर्षण मी शेतीकडे येण्यास कारणीभूत आहे. आयटी क्षेत्रात कितीही मेहनत केली तरी काही मिळवले असे वाटत नाही. त्याउलट वाढणारी रोपे खूप मानसिक समाधान देऊन जातात. 
श्रीनिवास राव,
शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT