Leopard News  sakal
मुंबई

Leopard News : मोखाड्यातील सायदे परिसरात बिबट्याचा वावर ; नागरीक दहशतीखाली

मोखाड्यात गेली दोन महिण्यांपासुन वेगवेगळ्या ठिकाणी, बिबट्या चे नागरीकांना दर्शन होत आहे. तसेच करोळ-पाचावर भागात बिबट्या ने मानवी वस्तीत शिरून एका वयोवृद्धाला जखमी केल्याची घटना देखील घडली आहे.

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : मोखाड्यात गेली दोन महिण्यांपासुन वेगवेगळ्या ठिकाणी, बिबट्या चे नागरीकांना दर्शन होत आहे. तसेच करोळ-पाचावर भागात बिबट्या ने मानवी वस्तीत शिरून एका वयोवृद्धाला जखमी केल्याची घटना देखील घडली आहे. आता दोन दिवसांपासून बिबट्या चा वावर सायदे परिसरात असल्याचे अनेकांना आढळून आले आहे. त्यामुळे येथील आदिवासींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने बिबट्या चा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे.              

पालघर आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर गेली अनेक दिवसांपासून बिबट्या चा मुक्त संचार सुरू आहे. बिबट्या ने श्रीघाट गावाच्या हद्दीत अनेक बकर्या आणि कोंबड्या फस्त केल्या आहेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच करोळ-पाचावर भागात बिबट्या ने मानवी वस्तीत शिरून एका वयोवृद्ध शेतकर्यांला गंभीर जखमी केले आहे. सदरच्या वयोवृद्धाने आरडाओरडा केल्याने तो बचावला होता. ही घटना ताजी असतांना, बिबट्या ने आता सायदे परिसरात आपला मोर्चा वळवला आहे.             

तालुक्यातील सायदे भागात गेली दोन दिवसांपासून, बिबट्या चा रात्री आणि पहाटे च्या सुमारास मुक्त संचार असल्याचे अनेकांना दिसुन आले आहे. मागील घटना बघता येथील आदिवासी दहशतीखाली वावरत आहेत. त्यामुळे वनविभागाने बिबट्या चा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवासी व पंचायत समिती चे माजी उपसभापती एकनाथ झुगरे यांनी केली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT