Raj-Thackeray 
मुंबई

'हे हिंदुराष्ट्र व्हावं!' राज ठाकरेंच्या भेटीला गुरु माँ कांचनगिरी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज ठाकरे यांना भेटायला गुरू माँ कांचन गिरी गेल्या आहेत. या भेटीवेळी सूर्याचार्य देखील उपस्थित आहेत. त्यांनी म्हटलंय की, हिंदुराष्ट्रासाठी मी मागील अनेक वर्षांपासून काम करते. हिंदुराष्ट्रासाठी प्रत्येकाने एकत्र येणे गरजेचं आहे, म्हणून मी भेट घेतेय असं त्यांनी म्हटलं होतं. या भेटीआधी त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर भेट दिली आहे.

या भेटीत राज ठाकरे यांनी त्या दोघांचं स्वागत केलं आहे. कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांना शिवाजी महाराजांचं चित्र भेट म्हणून दिलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत राज ठाकरे, शर्मिला ठाकरे देखील उपस्थित आहेत. कालच त्यांनी राज ठाकरे यांचं कौतुक केलं होतं तर उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली होती.

जे हिंदुत्व विचारांना एकत्र करुन चालतात, त्या बाळासाहेब ठाकरेंबाबत माझ्या मनात सन्मान आहे. यानंतर मी राज ठाकरेंच्या भेटीला जात आहे. हिंदू राष्ट्रासंदर्भात मी चर्चा करण्यासाठी चालले आहे. भारताला हिंदूराष्ट्र बनवण्यासाठी चर्चा करण्यासाठी मी ही भेट घेत असल्याचं त्यांनी या भेटीआधी स्पष्ट केलं होतं.

कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे, असं मत कांचन गिरी यांनी व्यक्त केलं होतं. मात्र, यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. मनसेनं आपला झेंडा बदलल्यानंतरच हिंदुत्वाकडे झुकण्याचे संकेत दिले होते. मागे झालेल्या दसऱ्यावेळी देखील मनसेनं गर्व से कहो हम हिंदू है, अशा आशयाचे पोस्टर्स लावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? संजय राऊतांना जिंकण्याचा विश्वास, म्हणाले...

Manvat Crime : 50 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून बेदम मारहाण; पोलिसांनी नाकाबंदीत पाच जणांना घेतलं ताब्यात

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Vastu Tips: पाकिटात काय ठेवावे आणि काय ठेवू नये? वास्तुशास्त्राचे 'हे' उपाय दूर करू शकतात पैशांची अडचण!

SCROLL FOR NEXT