Kirit Somaiya  sakal Media
मुंबई

उद्धव ठाकरेंना चॅलेंज, हिंमत असेल तर आमने-सामने चर्चा करा - सोमय्या

श्री जी होम्सवरुन साधला ठाकरे कुटुंबियांवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्यानं आरोप करणारे भाजपने नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं. हिंमत असेल तर माझ्याशी आमने-सामने चर्चा करा असं सोमय्या म्हणाले. (if you have courage lets have discussion face to face Kirit Somaiya given Challenge to CM Uddhav Thackeray)

संजय राऊत हे बोलवते धनी असून उद्धव ठाकरे हे मास्टरमाईंड आहेत, असा पुनरुच्चार करताना सोमय्या म्हणाले, माझ्यावर पीएपी लाटल्याचा आरोप केला. पण यासंबंधी एकही आरोप सिद्ध झाला नाही. किरीट सोमय्या, मेधा सोमय्या, नील सोमय्यांना फसवण्याचा प्रयत्न केला, पण आमच्याविरोधात एकही पुरावा मात्र दिला नाही. काल ट्विट केलं १०० कोटींचा घोटाळा, सामनात बातमी दिली की ३ कोटींचा घोटाळ, यानंतर उद्धव ठाकरेंनी याच्या चौकशीचे आदेश दिले. मी जेवढे घोटाळे काढले सगळ्यांचे पुरावे दिले. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर माझ्याशी आमने सामने चर्चा करावी माझं त्यांना खुलं आव्हान आहे, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.

दरम्यान, श्री जी होम्समध्ये आलेले पैसे हे शेल (बनावट) कंपनीतून आले आहेत. हे पैसे बेनामी असून ईडी आणि आयटी अधिकाऱ्यांशी आपण याबाबत चर्चा केली आहे. श्री जी हाऊस बेनामी संपत्ती घोषित करून त्यावर जप्ती आणावी अशी मागणी आपण केल्याचंही सोमय्या यावेळी म्हणाले. श्री जी होम्सचा खरा मालक कोण? हे लपवण्यासी लेयर तयार करण्यात आल्या. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं कारवाई करावी या मागणीवर त्यांच्याकडून आपल्यालाआश्वासनही देण्यात आलं आहे, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT