महिलांची सुरक्षा अंधारात 
मुंबई

महिलांची सुरक्षा अंधारात

अनिल चास्कर

मुंबई : प्रवासी, विशेषकरून महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवत असल्याचे दावे पालिका प्रशासनाकडून केले जातात; मात्र मूलभूत सोई-सुविधा पुरवण्यातही प्रशासन कमी पडत असल्याचे वास्तव समोर येत आहे. कांदिवली रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलावरून कांदिवली पूर्वेला जाण्यासाठी जवळपास एक किलोमीटर लांबीचा स्कायवॉक आहे; मात्र या स्कायवॉकवरील दिवे जवळपास महिनाभरापासून बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना अंधारातूनच येथून मार्ग काढावा लागत आहे. विशेषत: सायंकाळनंतर येथे सर्वत्र अंधार पसरत असल्याने जीव मुठीत घेऊनच जावे लागते, असे महिलांनी सांगितले.

कांदिवली रेल्वे स्टेशनहून पूर्वेला जाण्यासाठी तसेच रिक्षा वा बस पकडण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने स्कॉयवॉकचा वापर करतात. पहाटे ४ वाजेपासूनच पादचारी येण्यास सुरुवात होते; मात्र त्यांना अंधारातूनच वाट काढावी लागते. सध्याचे असुरक्षित वातावरण पाहता येथून जाताना प्रचंड भीती वाटते, असे महिलांनी सांगितले; शिवाय पुलावर भंगार उचलणारे भटकत असतात. काही तरुण नशा करण्यासाठी येतात. त्यामुळे काहीही अघटित घडू शकते, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली.

मी सांताक्रूझ शाळेत शिक्षिका आहे. पहाटे ६ वाजता कामावर जाण्यासाठी रेल्वे पकडते; मात्र स्कायवॉकवर संपूर्ण काळोख असल्याने माझ्या पतींना दररोज मला सोडायला यावे लागते, त्यामुळे त्यांनाही त्रास होतो. पुलावरील दिवे चालू ठेवल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. 
- मेघना गिरीधर, प्रवासी

या समस्येबाबत माहिती नव्हती; मात्र तसे असेल तर दिवे तातडीने सुरू करण्यात येतील. 
- संजय कुऱ्हाडे, सहायक आयुक्त, पालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT