local trains 
मुंबई

Mumbai Local Update : मुंबई-ठाण्यातील पावसाचा रेल्वे सेवेला फटका! बदलापूरहून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल १० ते १० मिनिटे उशिराने

Mumbai rains impact local trains : गेल्या दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई शहरात पावसाला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रोहित कणसे

मुंबई शहर आणि परिसरात पाऊस सुरू झाल्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई-ठाणे येथे होत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वहातूक मंदावली असून बदलापूरहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल १० ते १५ मिनीटांनी धावत आहेत. यामुळे सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई शहरात पावसाला सुरूवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई शहरात रिमझीम तर उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. आज आणि उद्या संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगर रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि पालघर या विभागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज कुठे पाऊ होणार?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (ता. 24) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच मुंबईसह उपनगरातही आज पावसाचे पुनरागम होणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, कल्याण, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नाशिक, जळगाव, नंदुरबार, या जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र हादरला! गुप्तधनासाठी स्मशानात अघोरी पुजा, कासव-घुबडासह विधवा-कुमारिकांचा वापर

आजचे राशिभविष्य - 17 एप्रिल 2026

Quick & Protein-Rich Breakfast : सकाळच्या घाईत 10 मिनिटांत बनवा 'पनीर स्टफ्ड मूग डाळ चिला'! हेल्दी अन् टेस्टी नाश्त्याचा बेस्ट कॉम्बो

Panchang 17 April 2026 : अमावस्या विशेष पंचांग! आजचे शुभ मुहूर्त, राहू काळ आणि संपूर्ण दिनविशेष

ढिंग टांग : मोठा मी होणार..!

SCROLL FOR NEXT