मुंबई

ठाणे स्थानकातील एसी शौचालयाला टाळे 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील वातानुकूलित शौचालय (डिलक्‍स टॉयलेट) बंद असल्याने स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची आबाळ होत आहे. या स्वच्छतागृहाचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराचा ठेका संपल्याने ही नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, निविदा प्रक्रिया राबवूनही अद्याप स्वच्छतागृह सुरू होत नसल्याने ठेकेदार मिळत नसल्याची चर्चा रंगली आहे. 

देशातील पहिली रेल्वे धावलेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज तब्बल सात लाख प्रवासी प्रवास करतात. ठाणे स्थानकातून दररोज मध्य रेल्वेच्या 782 अप-डाऊन आणि ठाणे-वाशी-पनवेलवर 282 अप-डाऊन उपनगरी लोकल तसेच, 80 अप आणि 70 डाऊन अशा मेल-एक्‍स्प्रेस धावतात. तर, ठाणे स्थानकातून नियमित 3.50 ते 4 लाख उपनगरी प्रवासी तिकिटांची विक्री होते. त्यामुळे ठाणे स्थानक नेहमीच गजबजलेले असते. स्थानकात मागील काळात विविध सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. 

नकातील गर्दीच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या पुरेशी नाही. 
फलाट क्रमांक 2 आणि 10 वर मिळून अवघी चार स्वच्छतागृहे आहेत. तर, फलाट क्रमांक 2 च्या बाहेर वातानुकूलित स्वच्छतागृह आहे. हे स्वच्छतागृह अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे स्थानकाचा लूक बदलत असला तरी प्रवाश्‍यांची मूलभूत गरज असलेल्या फलाट क्रमांक दोनलगतच्या वातानुकूलित स्वच्छतागृहाला गेल्या अनेक दिवसापासून टाळे लावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ठेकेदाराचा ठेका संपल्याने हे शौचालय बंद असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. 

तत्कालीन खासदार संजीव नाईक यांच्या पाठपुराव्याने या स्वच्छतागृहाचे काम मार्गी लागले होते. मात्र, खासदार राजन विचारे यांच्या कार्यकाळात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांपैकी ठाणे स्थानकात वातानुकूतिल स्वच्छतागृह सुरू करण्याचा पहिला मान ठाण्याला मिळाला. रेल्वे प्रशासनाकडून ठेका पद्धतीने हे स्वच्छतागृह चालवले जाते.

त्यानुसार सद्यस्थितीत ठेका संपल्याने फलाट क्रमांक दोनबाहेर रेल्वेचे वातानुकूलित टायलेट बंद ठेवल्यामुळे आता पुरुषांबरोबर महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना संपर्क साधला असता, त्यांनी निविदाप्रक्रिया अंतिम झाल्याचे सांगून लवकरच हे वातानुकूलित स्वच्छतागृह सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले. 

मध्य रेल्वे प्रशासनाने ठेका संपण्यापूर्वीच याबाबतची नव्याने निविदाप्रक्रिया राबवणे गरजे होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने यात दिरंगाई केली. त्याचबरोबर रेल्वेने सुरू असलेले स्वच्छतागृह ताब्यात घेऊन खासगी व्यक्तीमार्फत अथवा रेल्वेच्या सफाई कंत्राटदारामार्फत सुरू ठेवण्याची तजवीज करणे अपेक्षित होते. त्यामुळे ठेकेदार मिळेपर्यंत तरी प्रवाशांची गैरसोय टाळता आली असती. 
- देविदास गवस 
रेल्वे प्रवासी, ठाणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT