sandeep 1.jpg 
मुंबई

'लॉकडाउनमध्ये कृष्णकुंज मंत्रालय होतं, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं'

दीनानाथ परब

"लॉकडाउन हा महाराष्ट्रातील जनतेला परवडणारा नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही लॉकडाउनला विरोध आहे हे मुख्यमंत्र्यांनी ध्यानात घ्यावे. आनंद महिंद्रा यांनी आरोग्य सुविधा वाढवण्याचा सल्ला दिला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ५० डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक उपलब्ध करुन द्या, असे उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की लोक स्वतहून सरकारला मदत करायला म्हणून समोर आले. प्रादुर्भाव कमी झाल्यावर त्यांना कामावर काढून टाकलं . आता लोकांच्या मनातील विश्वासहर्ता कमी झालीय, म्हणून तुम्हाला डॉक्टर, आरोग्य सेवक मिळत नाहीत. दुसऱ्याकडे बोट दाखवताय, त्यावेळी तीन बोट तुमच्याकडे आहेत, हे देखील लक्षात ठेवा" अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी सुनावले. '

"तुम्ही लॉकडाउन केला. वर्षभरात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. दुकान बंद झाली. विजेची बील कुठून भरायची. उलट तुम्ही वीज तोडली" अशी टीका मनसेने केली.

"लॉकडाउनची भीती निर्माण करता, पण गेल्या वर्षभरात तुम्ही किती कार्यालयांशी चर्चा केली. गर्दी कमी व्हावी म्हणून वर्षभर काय उपायोजना राबवल्या. खासगी कार्यालयांशी बोललात का? मंत्रालय, महापालिका, जिल्हापरिषदे इथे कार्यालयीन वेळ बदलण्यासाठी उपयोजना केली का?" असा सवाल देशपांडे यांनी विचारला. 

"मार्शल लोकांकडून टार्गेट पूर्ण करण्यासाठी जबरदस्ती पावत्या फडतात वर्षभर कोरोनाची टेंडर काढण्याशिवाय काय उपयोजना केल्या?" अशी बोचरी टीका देशपांडेंनी केली. "रस्त्यावर उतरणं आम्हाला तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही. दांडुके उचलणाऱ्या पोलिसांना लोकांनी स्वत:हून मदत केली" असे देशपांडे म्हणाले. 
"लॉकडाउनच्या काळात आमचे राजसाहेब सगळ्यांना भेटत होते. कृष्णकुंज मंत्रालयाचा नवीन पत्ता झाला होता, हे लक्षात ठेवा. कारण तेव्हा तुम्ही घरी होता, लोकांना भेटत नव्हता" अशी टीका देशपांडे यांनी केली. 

तज्ज्ञांची परिभाषा नाही समजली
लॉकडाउन बद्ददल काय करावं असं काल मुख्यमंत्र्यांनी विचारलं. जनतेने उत्तर द्याव असं मुख्यमंत्री म्हणाले.  इतका कनफ्युज मुख्यमंत्री बघितला नाही. काल मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांशी चर्चा करणार असे सांगितले.  हे तज्ज्ञ कोण समजले नाही. त्यांचा आजचा कार्यक्रम पाहिला, तर ते जीम मालक, नाटय निर्माते आणि संपादकांना भेटणार आहेत. हे सगळे तज्ञ असतील, त्यांच्याशी चर्चा करणार असतील, तर तज्ज्ञ कोण याची परिभाषा समजली पाहिजे, असे देशपांडे म्हणाले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल टप्प्याटप्प्याने 25 रुपयांपर्यंत महागण्याचा इशारा; आज किती आहे दर?

Kolhapur Amboli Highway Toll Free : कोल्हापूर -आंबोली राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनांना टोल माफ, तहसिलदारांची माहिती

KKR vs GT कोलकताचा आज पराभव झाला तर प्लेऑफचे स्वप्न संपणार? आज गुजरातविरुद्ध सामना, पाहा संभावित Playing XI

Monsoon In Andaman : मॉन्सूनचे अंदमानात आगमन; महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर कधी धडकणार तारीख आली समोर, प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; माणगाव, इंदापुरात वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT