Lok Sabha Poll Sakal
मुंबई

Lok Sabha Poll : भाजप कडून जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांना ऊमेदवारी? खोडसाळ पत्राने जिल्ह्यात खळबळ

पालघर लोकसभेच्या जागेसाठी महायुतीचा ऊमेदवार निश्चित झालेला नाही. या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. तर विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांच्या ऊमेदवारी ला भाजप कडुन ऊघड विरोध होत आहे.

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा

मोखाडा -  पालघर लोकसभेच्या जागेसाठी महायुतीचा ऊमेदवार निश्चित झालेला नाही. या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. तर विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांच्या ऊमेदवारी ला भाजप कडुन ऊघड विरोध होत आहे.

तसेच शिवसेनेतून अंतर्गत विरोध केला जातो आहे. या गदारोळात पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या भाजप कडून ऊमेदवारी चे पत्र समाज माध्यमातून सर्वत्र प्रसारित झाले आहे.

त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या गोटात तसेच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सदरचे पत्र खोटे असुन खोडसाळ वृत्तीने कुणी अज्ञाताने प्रसारित केल्याची माहिती शिवसेना व भाजप च्या पदाधिकार्यांनी दिली आहे. याबाबत मुंबईत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

राज्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटप आणि ऊमेदवार निश्चितीचा तिढा सुटलेला नाही. याच तिढ्यात पालघर ची जागा महायुतीत अडकली आहे. शिवसेनेने ही जागा आपलीच असुन ऊमेदवार म्हणून विद्यमान राजेंद्र गावीत यांचे नाव घोषित केले आहे.

मात्र, या जागेवर भाजप ने देखील दावा केला आहे तसेच  राजेंद्र गावीतांच्या ऊमेदवारी ला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे पालघर च्या जागेचा आणि ऊमेदवारी चा प्रश्न महायुतीत अडकला आहे. 

महायुतीत पालघर च्या जागेचा तिढा सुटलेला नसताना, सोमवारी  15  एप्रिल ला रात्री अचानक पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांना भाजप कडून ऊमेदवारी जाहीर झाल्याचे पत्र समाज माध्यमातून सर्वत्र प्रसारित झाले आहे.

प्रकाश निकम हे शिवसेनेचे आहेत आणि अचानक भाजप कडुन ऊमेदवारी मिळाल्याचे पत्र प्रसारित झाल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रसारित झालेल्या पत्रावर भाजप चे राष्ट्रीय महासचिव तथा मुख्यालय प्रभारी अरूण सिंह यांची स्वाक्षरी असल्याचे दर्शविण्यात आले आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यामध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. दरम्यान, अज्ञाताने केलेल्या या खोडसाळ कृतीने, भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत शितयुध्द चव्हाट्यावर आले आहे, त्याची पालघर जिल्ह्यात सर्वच क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. 

खोडसाळ वृत आणि पत्र, मी ऊमेदवारी साठी इच्छुक...

समाज माध्यमातून सर्वत्र प्रसारित झालेले माझ्या ऊमेदवारी चे पत्र हे खोटे आहे. कुणीतरी हा खोडसाळ पणा केला आहे. मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्या भाजप कडून ऊमेदवारी ची बातमी खोटी आहे. मात्र, आपण ऊमेदवारी च्या स्पर्धेत असल्याचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सांगितले आहे. 

खोडसाळ पत्राची पोलीस ठाण्यात तक्रार...

कुणीतरी खोडसाळ वृतीने हे पत्र समाज माध्यमातून सर्वत्र प्रसारित केले आहे. यामध्ये मोठे षडयंत्र असल्याचा संशय आहे. आमच्या मुंबई प्रदेश कार्यालयातुन या विषयी कायदेशीर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तसेच त्याचा शोध घेण्याची मागणी केली असल्याची माहिती पालघर लोकसभा प्रचार प्रमुख नंदकुमार पाटील यांनी दिली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT