BJP
BJP 
मुंबई

Loksabha 2019 : भाजपासाठी जुनं तेच सोनं ठरलं

सकाळवृत्तसेवा

मुंबई - नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सामोरे जाताना अर्ध्याहून जास्त उमेदवार बदलतात या वास्तवाला महाराष्ट्राच्या पहिल्या यादीनेच छेद दिला. सुनील गायकवाड (लातूर) आणि दिलीप गांधी (नगर) वगळता सर्व खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक किरीट सोमय्या यांना सध्या गॅसवर ठेवण्यात आल्याचे दिसते.

विदर्भातील सर्व भाजप उमेदवारांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या कार्यसम्राट रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी यांना नागपुरात पुन्हा संधी दिली जाणार हे उघड होते. त्यांच्यासमवेत गृहराज्यमंत्री हंसराज अहीर (चंद्रपूर) आणि संरक्षणराज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे (धुळे) यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. वर्ध्यातून चंद्रकांत तडस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. येथे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी मुलगा समीर (गेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार) याच्यासाठी आग्रह धरल्याने येथून कोणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष होते.

मात्र जनसंपर्कात आघाडीवर असलेल्या तेली समाजातील तडस यांच्यावर अन्याय झाला नाही. अकोला येथून सलग तीन वेळा संजय धोत्रे, तर गडचिरोलीतून अशोक नेते दोन वेळा निवडून आले आहेत. प्रस्थापित विरोधी लाटेचा मुद्दा पुढे येत नसल्याचे सर्वेक्षणातून पुढे आल्याने त्यांना उमेदवारी मिळाली. भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल आहेत काय याचा अंदाज आल्यावर भाजपचा उमेदवार ठरेल. येथे डॉ. परिणय फुके यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादीतून भाजपत आलेल्या विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हीना गावित (नंदूरबार) स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम (बीड) एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा (रावेर), तसेच भाजयुमोच्या राष्ट्रीय अध्यक्ष पूनम प्रमोद महाजन (उत्तर मध्य मुंबई) या तरुणी ब्रिगेडलाही संधी दिली आहे. एकाही महिलेला डावलण्यात आलेले नाही.
.....
लातुरात सुनील गायकवाड यांच्याबद्दल नाराजी होती. मुख्यमंत्री फडणवीस यांचे खंदे समर्थक कामगारमंत्री संभाजीराव निलंगेकर यांचे विश्‍वासू सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली ते निवडून येण्याच्या विश्‍वासामुळे. नगर महापालिकेत घरच्याच उमेदवारांना निवडून आणू न शकलेल्या दिलीप गांधी यांच्या बद्दल नाराजी होतीच, प्रत्यक्ष विरोधी पक्षनेत्याचा मुलगा सुजय राधाकृष्ण विखे पाटील भाजपत आल्याने हा बदल सोपा झाला असावा.

सांगलीमध्ये केवळ निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन संजयकाका पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून, येथे स्थानिक आमदारांची नाराजी दूर करताना पक्षश्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT