मुंबई - रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्याबद्दलचा गैरसमज दूर झाला असून, तेच उमेदवार असतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (शनिवार) स्पष्ट केले.
धार्मिक कट्टरतावादाच्या विरोधात काँग्रेसने सतत संघर्ष उभारलेला असला तरी रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार सनातनचा आरोपी साधकाचा समर्थक असल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. नवीनचंद्र बांदिवडेकर यांना काँग्रेसची या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. मात्र, नालासोपारा येथे "एटीएस'ने स्फोटकासह पकडण्यात आलेल्या वैभव राऊत याचे समर्थन त्यांनी केले होते. गंभीर गुन्ह्यातील आरोपीचे समर्थन करणारे नवीनचंद्र बांदिवडेकर हे कॉंग्रेसचे उमेदवार होऊच कसे शकतात? असा सवाल देशभरातील पुरोगामी संघटना व कार्यकर्त्यांनी केला होता.
त्यामुळे, हा उमेदवार बदलण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याची माहिती होती. अखेर काँग्रेसने त्यांचीच उमेदवारी कायम ठेवत त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर झाल्याचे म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.