Loksabha News sakal
मुंबई

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान होणार आहेत,असे सांगून राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील आपल्या भाषणात महाराष्ट्रासाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या.

मात्र,नरेंद्र मोदी यांनी भाषणात बुलेट ट्रेन वगळता राज ठाकरे यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही. मनसे कार्यकर्त्यांसोबत सामान्य माणसात याची चर्चा रंगली होती.

राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा एकाच मंचावर आले होते.शिवाजी पार्कची सभा यशस्वी होण्यासाठी भाजपसोबत मनसैनिक राबत होते.

सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. सभा सुरू झाल्यावर राज ठाकरे यांनी राज्यासाठी नरेंद्र मोदी यांच्याकडे साकडे घातले.

दोन्ही पक्षांतील समन्वय बघता हे पूर्वनियोजीत असेल आणि मोदी या मागण्यांवर उत्तर देतील, असे बहुतांश कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांना वाटले.

मात्र पंतप्रधानांनी मुंबईचे २०४७ व्हिजन घेऊन आल्याचे सांगतिले. मात्र ठाकरे यांच्या मागण्यांवर काही भाष्य केले नाही. महत्त्वाचे म्हणजे या मागण्या नेहमीच्या आणि मुंबई, कोकणासाठी महत्त्वाच्या आहेत.

राज ठाकरे यांच्या मागण्या

- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा.

- मराठा साम्राज्य इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.

- शिवछत्रपतींचे गडकिल्ले. या किल्ल्यांचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावे.

- मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT