वाशी - एकीकडे करदात्या नागरिकांना पाणीकपात करण्यात येत आहे, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी सोडण्यात येत आहे. मात्र बेकायदा उभ्या राहिलेल्या चाळी, दुमजली घरे तसेच गावठाणमधील अनधिकृत इमारतींना बेसुमार पाणीपुरवठा होत आहे. अनधिकृतपणे पाणी वापरणाऱ्या नळजोडण्या निष्कासित करण्याचा दिखावा नवी मुंबई पालिका प्रशासनाच्या कारवाईतून करण्यात येत आहे. मात्र अनेक भागांत कमी दाबाने येणार्या पाण्यामुळे नवी मुंबईकर त्रस्त असून अनधिकृत नळजोडण्यांवर ठोस कारवाईची मागणी करण्यात येत आहे. नवी मुंबई शहरातील एमआयडीसी भागात अनधिकृत झोपड्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. अनेकांनी घर भाड्याने देण्यासाठी अथवा गरजेपोटी दुमजली घर बांधण्याचा सपाटा लावला आहे. मात्र या अनधिकृत बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरण्यात येत आहे.
एमआयडीसी, गावठाण, सिडको वसाहतीत बांधण्यात येणाऱ्या चाळी, इमारती, घरांच्या डागडुजीसाठी सर्रास पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यात येतो. महापालिका क्षेत्राची लोकसंख्या जवळपास १६ लाख असून पाणी वितरणात मात्र असमानता दिसून येते. शहरात अनधिकृत नळजोडण्या मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप अनेकदा लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. मात्र तरीही ठोस कारवाई होत नसल्याने पाणीटंचाईला भेडसावते. एमआयडीसी बारवी धरणातून तर पालिका मोरबे धरणातून नवी मुंबईला पाणीपुरवठा करते. पाणी साठा सप्टेंबर महिन्यापर्यंत पुरावा, यासाठी पुरवठा करताना कमी दाबाने केला जात आहे.
मोटार लावण्याने नियोजनात अडचणी
बांधकामांसाठी पिण्याचे पाणी वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. बांधकामांना पाणी वापरण्यासाठी बेकायदेशीरपणे मोटार लावली जाते. त्यामुळे काही ठिकाणी अधिक तर काही ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होतो. त्यामुळे अशा ठिकाणी विशेष पथक नेमण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.