Mahad MIDC blast Update Blue Jet Healthcare company seven dead bodies recovered by NDRF  
मुंबई

Raigad Mahad MIDC : महाड एमआयडीसी स्फोटात दगावलेल्या सात कामगारांचे मृतदेह सापडले; नातेवाईकांचा कंपनीबाहेर आक्रोश

महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटामध्ये अकरा कामगार बेपत्ता होते.

सुनिल पाटकर

महाड : महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटामध्ये अकरा कामगार बेपत्ता झाले असून यापैकी सात जणांचे मृतदेह एनडीआरएफ च्या हाती लागले आहेत. दरम्यान कंपनीच्या गेट बाहेर कामगारांच्या नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून मालकावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

ब्लू जेट या कंपनीमध्ये तीन नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता स्फोट होऊन सात कामगार जखमी झाले होते. तर अकरा कामगार दगावल्याची भीती व्यक्त केली जात होती. संपूर्ण कंपनीचे स्ट्रक्चरच आगीमध्ये जळून गेल्याने येथील कामगारांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ला पाचारण केलेले होते काल रात्रीपासून त्यांचे मदत कार्य सुरू होते.

आज सकाळपासून जळालेल्या अवस्थेमध्ये सात कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. या कामगारांची ओळख पटवणे देखील मोठे कठीण होणार असल्याने याबाबत प्रशासन पुढील निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. दरम्यान 24 तास ओलांडून गेले तरीही प्रशासनाकडून या अपघातात जबाबदार असणाऱ्या कोणावरही कारवाई केली जात नसल्याने अनेक कामगारांच्या नातेवाईकांनी कंपनीच्या गेट समोर संताप व्यक्त केला. कंपनीच्या मालकाला पकडून समोर आणा व त्याच्यावर कारवाई करा अशा प्रकारचा आक्रोश कामगारांनी या ठिकाणी व्यक्त करत होते.

एका बाजूला आपल्या घरातील व्यक्ती दगावण्याचे दुःख असताना दुसरीकडे मात्र हा संताप त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसून येत होता. या अपघातामध्ये महाड तालुक्यातील तळीये, चोचींदे खरवली व पडवी या ठिकाणचे स्थानिक कामगार देखील दगावले आहेत. याशिवाय काही राज्यातील व परप्रांतातील कामगारांचा देखील समावेश आहे. बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांचे सांगाडे एकत्रित करून ते ग्रामीण रुग्णालयामध्ये पुढील तपासणीसाठी रवाना केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT