मुंबई

Maharashtra Accident News: राज्यभरातील रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या झाली कमी

सकाळ वृत्त सेवा

राज्यभरातील रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्याचे राज्य सरकारने उद्दिष्ट ठरवले होते. यात जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा प्रथम, चंद्रपूर जिल्हा द्वितीय तर नवी मुंबई शहराने तिसरा क्रमांक पटकावला आहे.


परिवहन विभागातर्फे राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२४ चा उद्घघाटन सोहळा मुंबईत पार पाडला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते नवी मुंबईच्या वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे आणि उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

नवी मुंबई शहरात पोलिस विभाग, महापालिका, सिडको, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट (वारंवार अपघात होणारे ) अपघातप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण, तपासणी आणि अभ्यास करून, त्यातील त्रुटी शोधून काढून आवश्यक ते बदल करून अपघात संख्या कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

त्याचा परिणाम म्हणून नवी मुंबई शहरातील तुलनेत अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ही १७.७ टक्क्यांनी कमी झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ या वर्षात ही आकडेवारी असून नवी मुंबई विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT