CM Eknath Shinde sakal
मुंबई

Maharashtra Din : मुंबईत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

मुंबईत आज (ता.१) महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. राज्यपाल रमेश बैस यांनी शिवाजी पार्कवर ध्वजारोहण केले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत आज (ता.१) महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. राज्यपाल रमेश बैस यांनी शिवाजी पार्कवर ध्वजारोहण केले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले.

मुंबई - मुंबईत आज (ता. १) महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. राज्यपाल रमेश बैस यांनी शिवाजी पार्कवर ध्वजारोहण केले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. विविध राजकीय पक्ष, आस्थापना, संस्था, संघटनांनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध कामगार संघटनांनी आपापल्या कार्यालयांमध्ये कामगार दिन साजरा केला. कामगार मेळावे, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबईत विकास कामांचा आढावा घेतला. त्यांनी विधायक कामांना वेग देण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. यावेळी पालक मंत्री मंगलप्रभात लोढा, पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल त्यांच्या समवेत होते. विधान भवनात विधान सभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर, आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांनी ध्वजारोहण केले.

मुंबईतील सामाजित संस्था, संघटना, आस्थापना, गृहनिर्माण संस्था यांनी महाराष्ट्र दिन साजरा केला. रेल्वे स्थानकावर महाराष्ट्राची गौरव गिते वाजविली जात होती. कामगार संघटनांनी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असे संयुक्त कार्यक्रम साजरे केले. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. महाराष्ट्र दिना निमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या पोलीस परेडच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतूक सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले होते.

वांद्रेमध्ये उत्तर भारतीयांचा महाराष्ट्र दिन

उत्तर भारतीय संघाने महाराष्ट्र दिन वांद्रे येथे साजरा केला. पारंपरिक वेषभूषेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा जपणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या वेळी ३० दिव्यांगांना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलींचे वाटपही उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर.एन.सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! RBIच्या मोठ्या निर्णयाआधी उलटफेर; जाणून घ्या आजचा ताजा भाव

९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेलं प्रकरण काय होतं? कोर्टाने का म्हटलं ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’?

'या' ग्लॅमरस मराठी अभिनेत्रींचं दुसरं लग्न चर्चेत; एका अभिनेत्रीची प्रेमकहाणी आहे भन्नाट!

Nagpur Crime: नागपूर हादरलं! चप्पल अदलाबदलीच्या वादातून युवकाची हत्या... चार आरोपी अटकेत

Pune Tanker Accident : वानवडीत पाण्याच्या टँकरच्या धडकेत 24 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; डोकं चाकाखाली चिरडलं, चालक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

SCROLL FOR NEXT